‘या’ सवयी असतील तर लगेच थांबवा; अन्यथा किडनी फेल झालीच म्हणून समजा!

. जे हेल्थ कॉन्सियन्स आहेत, ते आपली प्रकृती सांभाळून कामकाज करत असतात; परंतु काही जण प्रकृतीची हेळसांड करून कामाला प्राधान्य देतात.

  सांभाळा किडनीचे आरोग्य
  आजची जीवनशैली अतिशय घाईची आणि अनियमित बनली आहे. सकाळी सहापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत काम करणारे मंडळी आपल्या झोपेकडे, जेवणाकडे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. जे हेल्थ कॉन्सियन्स आहेत, ते आपली प्रकृती सांभाळून कामकाज करत असतात; परंतु काही जण प्रकृतीची हेळसांड करून कामाला प्राधान्य देतात.

  अशा व्यक्तींना कालांतराने उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. या आजारातून मूत्रपिंड विकार उद्भवतो. हा विकार होऊ नये यासाठी तरुण वयापासूनच चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे. मद्यमान, धूम्रपान आणि आहारातील अनियमितपणा हे तीन प्रमुख कारणे मूत्रपिंड विकाराबाबत सांगता येतील. संतुलित आहाराबरोबरच वाईट सवयीपासून चार हात दूर राहणे चांगल्या प्रकृतीसाठी गरजेचे आहे.
  कारणे

  सिगारेट ओढणे : अनेकांना वाटते की सिगारेट ओढण्याचा परिणाम केवळ फुफ्फुसावर होतो; परंतु असे समजणे चुकीचे आहे. कारण शरीरातील आतील रचना परस्परांवर अवलंबून असल्याने एका वाईट गोष्टीचा परिणाम हळूहळू सर्वच क्रियेंवर होतो. सिगारेट ओढळ्यामुळे मूत्रात प्रोटिन वाढते आणि त्यामुळे किडनीच्या कामावर दाब वाढतो. अभ्यासात असा नित्कर्ष निघाला आहे की, सिगारेटच्या अतिव्यसनामुळे तीव्र किडनीचा आजार होण्याचा संभवतो. विशेषत: मधुमेह असेल तर.

  साखर : शुद्ध साखर आणि फळापासून तयार केलेली साखरेपासून किडनीला फारसा धोका संभवत नाही. शुद्ध साखर हे शरीरातील शुद्ध अॅटसिड असते. साखर थेटपणे किडनीवर परिणाम करत नाही; परंतु साखरेच्या असंतुलित प्रमाणाचा फटका किडनीला बसू शकतो. विशेषत: मधुमेह असलेल्या व्यक्तींना किडनीची काळजी घ्यावी लागते.

  औषधी : औषधांच्या अतिसेवनामुळेही नकळतपणे किडनीवर त्याचे विपरीत परिणाम होतात. विशेषत: वेदनाक्षमक गोळ्यांचा, औषधाचा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. अंगदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी याशिवाय अन्य आजारासाठी पेनकिलर किंवा वेदनाक्षमक गोळ्यांचे सेवन करतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण त्या गोळ्या घेतो. या गोळ्या किडनीला मारक असतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. किडनीच्या रक्तपुरवठा करणार्या रक्तपेशींवर त्याचा परिणाम होतो. गोळ्यांच्या वारंवार सेवनामुळे पेशी आकुंचन पावण्याची शक्यता असते. अशा गोळ्या डॉक्टरांच्या देखरेखीखालीच घ्याव्यात.

  उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाबाचाही परिणाम किडनीवर होतो. अपुरी झोप, नियमित जेवणाचा अभाव, व्यायामाचा अभाव तसेच झोप कमी असल्याने रक्तदाबाच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे किडनीच्या कामावर रक्तातील कमी जास्त दाब हा परिणाम करू शकतो. नियमित आणि चांगली झोप, व्यायाम, संतुलित आहार ठेवल्यास रक्तदाब योग्य राहतो आणि किडनीवरही परिणाम होत नाही. किडनी चांगल्या स्थितीत काम करू शकते.

  फळांची अॅढलर्जी : फळआहार शरीरासाठी उत्तम मानला गेला आहे; परंतु अनेकांना या फळांची अॅढलर्जी असल्याचे ठावूक नसते. तरीही ते फळांचे सेवन करत असतात. अशा फळांचा परिणाम किडनीवर होतो. काहींना फळ खाल्ल्यावर शरीराला खाज सुटते. यावरून त्या फळाची अॅवलर्जी असल्याचे समजले पाहिजे; परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याचबरोबर सायनस प्रॉब्लेम, डोकेदुखी यामुळे किडनी कामकाजात अडचणी येतात. डॉक्टरांकडून चाचणी करून योग्य आणि वेळीच निदान करून घेणे गरजेचे आहे.