निरक्षर लोकांना हृदयविकाराच्या झटक्याचा धोक जास्त

निरक्षर किंवा माध्यमिक इयत्तेमध्ये शिक्षण सोडून देणाऱ्यांना पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीपेक्षा अधिक असतो.

कमी शिकलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळविणे अवघड तर जाते पण त्याचबरोबर त्यांना जीवनात इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या आरोग्यावर होत असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी व सेक्स इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी शिक्षण व हृदयरोग यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित केला आहे. याबाबतीत ते असे म्हणतात की, निरक्षर किंवा माध्यमिक इयत्तेमध्ये शिक्षण सोडून देणाऱ्यांना पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीपेक्षा अधिक असतो. या संशोधनाचे प्रमुख रोजमॅरी कोरडा यांनी सांगितले, हा निष्कर्ष जरी आश्चर्यचकित करणारे असले तरी निरक्षर लोकांना हृदयरोगासंबंधीचा धोका १५० टक्क्यांपेक्ष अधिक असतो.

२.६७ लोकांवर केले संशोधन

शिक्षण आणि हृदयरोग यांच्यात संबंध प्रस्थापित करणाऱ्या संशोधकांनी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्याच्या ४५ ते ६४ वर्षांच्या सुमारे २६७१५३ लोकांवर संशोधन केले. यात पुरुष व स्त्रिया दोघांचाही समावेश होता. यात असे आढळून आले की, व्यक्ती जेवढी कमी शिकलेली होती, तिला हृदरविकाराचा झटका व हृदयरोग होण्याचा धोका तेवढाच जास्त होता. हे संशोधन इंटरनॅशनल जर्नल फॉर इक्विटी इन हेल्थमध्ये प्रकाशित झाले.

१५० टक्के अधिक धोका

या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, पदवीधारकांच्या तुलनेत जे निरक्षर आहेत त्यांना हृदयरोग होण्याचे प्रमाण सुमारे १५० टक्के अधिक होता. दहावी उत्तीर्ण लोकांमध्ये हे प्रमाण ७० टक्के व पदवीचे शिक्षण मध्येच सोडून जाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ५० टक्के जास्त असते.

खराब राहणीमान जबाबदार

यह संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की, निरक्षर लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका जास्त आढळण्याचे कारण त्यांचे खराब राहणीमान होय. या संशोधनात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या कॅरी डोयन यांनी सांगितले की, सुशिक्षित लोकांना चांगली नोकरी मिळते. त्यामुळे त्यांचे राहणीमानाची पातळी चांगली असते. ते चांगल्या ठिकाणी राहतात व पौष्टिक जेवण जेवतात. यामुळे त्यांचे हृदय निरोगी राहते व त्यामुळेच त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो.