कंडोम व्यतिरिक्त ‘हे’ पर्यायही आहेत गर्भधारणा रोखण्यासाठी परिणामकारक; तुम्हाला माहिती आहे काय?

मातृत्व नको असलेली स्त्री कदाचितच जगात कुठे सापडेल, परंतु गर्भारपण ही स्त्रीच्या आयुष्यातील एक मोठा आणि जबाबदारीचा टप्पा आहे आणि त्याचा विचार गांभीर्यपूर्वक केला पाहिजे. विशेष म्हणजे आजची पिढी याबद्दल अधिक सजग झालेली आहे. आधी गर्भधारणा टाळण्यासाठी  कंडोमचाच पर्याय जास्तीत जास्त वापरल्या जायचा परंतु आता तसे नाही. कंडोम व्यतिरिक्तही अनेक पर्याय स्त्री आणि पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. जाणून घेऊया काय आहेत हे उपाय.

१. इंट्रायूटरिन डिव्हाइस स्त्रियांसाठी एक चांगला जन्म नियंत्रण पर्याय आहे. असुरक्षित संभोगानंतर पाच दिवसांच्या आत तुमच्या डॉक्टरांकडून ते बसवून घेऊ शकता. ही पद्धत सुरक्षित आहे. हे साधन आपल्या शरीरात ५ ते १० वर्षांच्या कालावधीपर्यंत ठेवले जाऊ शकते आणि ते नको असलेली गर्भधारणा टाळण्यास मदत करू शकते.

२. मॉर्निंग–आफ्टर पिल ही आणखी एक पद्धत आहे जी गरोदरपण दूर ठेवण्यासाठी वापरली जाऊ शकते. असुरक्षित संभोगानंतर ७२ तासांच्या आत याचा वापर केला जाऊ शकतो, तो वापरण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ द्या.

३. डेपो–प्रोव्हरा आजकाल बरेच लोकप्रिय होत आहे. हे हार्मोन–आधारित गर्भनिरोधक इंजेक्शन आहे जे दर तीन महिन्यांनी दिले जाते. सहसा, हात किंवा नितंबांमधील स्नायूंवर हे गर्भनिरोधक इंजेक्शन दिले जाते. हे अत्यंत महत्वाचे आहे की प्रभावी होण्यासाठी हे इंजेक्शन प्रत्येक तीन महिन्यांनी दिले जाणे आवश्यक आहे.

४. नसबंदी ही आणखी एक सामान्य पद्धत आहे ज्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. ही कायमस्वरूपी पद्धती आहे आणि म्हणूनच, त्यास निवडण्यापूर्वी विचार करणे आवश्यक असते.

५. शुक्राणूनाशक असलेले डायफ्राम हे आणखी एक साधन आहे जे डॉक्टरांकडून बसवून घ्यावे लागते. हे साधन गर्भाशय ग्रीवाचे संरक्षण करते आणि कमीतकमी ६ तास गर्भधारणा रोखण्यास मदत करते. २४ तासांपेक्षा जास्त वेळ न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

६. गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा गर्भधारणेपासून संरक्षण मिळण्यासाठी उत्तम पर्याय आहे. पण त्यासाठी गोळी चुकवणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. ह्या गोळ्यांच्या नियमित वापरामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात.

७. गर्भधारणा टाळण्यासाठी गोळ्यांव्यतिरिक्त बर्थ कंट्रोल इम्प्लांट हा महिलांसाठी आणखी एक पर्याय आहे. हे इम्प्लांट्स म्हणजे आगपेटीतील काडीच्या आकाराचे रबर रॉड्स असतात आणि डॉक्टरांकडून खांद्याजवळ बसवून घ्यावे लागतात.

८. जेव्हा गर्भधारणा रोखण्याची वेळ येते तेव्हा ट्यूबक्टॉमी हा कायमस्वरूपी उपाय असतो. ट्यूबल नसबंदी म्हणून देखील ही शस्त्रक्रिया ओळखले जाते. ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यायोगे एखाद्या महिलेच्या बीजवाहिन्या कापल्या जातात आणि नंतर बंद केल्या जातात. ही बऱ्यापैकी सुरक्षित पद्धत आहे आणि आधी बाळ असलेल्या जोडप्यांसाठी ती प्रभावी आहे.

गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुषांसाठीचे जन्मनियंत्रण पर्याय खालीलप्रमाणे

१. कंडोम ही संरक्षणाची सर्वात सोपी आणि सर्वोत्तम पद्धत आहे जी पुरुष लैंगिक संबंधात वापरू शकतात.

२. संततिनियमनासाठी पुरुषांसाठी एक कायमस्वरूपी पर्याय म्हणजे पुरुष नसबंदी. ह्यासाठी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल. जननेंद्रिय ताठ होणे किंवा स्खलन ह्यामुळे थांबणार नाही.

३. पुरुषांकरिता कुठलेही साधन न वापरता संतती नियमनाचा आणखी एक पर्याय आहे आणि तो म्हणजे स्खलनाआधी शिश्न बाहेर काढून घेणे. परंतु या पद्धतीची शिफारस केली जात नाही कारण ही पद्धती विश्वासार्ह नाही.