पूर्वीच्या काळी स्त्रिया ‘या’ कामासाठीसुद्धा वापरायच्या कांदा; आश्चर्यकारक आहे माहिती

इजिप्तमध्ये ख्रिस्तीयन संस्कृतीच्या अगोदर तीन हजार वर्षांपूर्वी कांद्याची लागवड केली अशी माहिती उपलब्ध आहे. इजिप्शियन राजा रॅमसेस चतुर्थ याच्या ममीमध्ये तर कांद्याचे अवशेष देखील सापडले आहेत.

    कांदा हा आपल्या स्वयंपाक घरातला महत्वपूर्ण घटक आहे. तसेच घरगुती आयुर्वेदिक उपचारांत कांद्याला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र तुम्हांला ठाऊक आहे का, कांद्याचा उपयोग हा चव वाढविण्यासोबत लैंगिक शक्ती, अकाली उत्सर्ग, वीर्य आणि नपुसंकत्व यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी देखील होतो.

    काही लोक हे कांद्याचा उपयोग जेवणात चव वाढविण्यासाठी करतात. तसेच काही लोक हे कोशिंबीरमध्ये कांद्याचा उपयोग करतात. मात्र आज आम्ही तुम्हांला कांद्याबद्धल अशी काही माहिती सांगणार आहोत, जी ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल.

    इजिप्तमध्ये ख्रिस्तीयन संस्कृतीच्या अगोदर तीन हजार वर्षांपूर्वी कांद्याची लागवड केली अशी माहिती उपलब्ध आहे. इजिप्शियन राजा रॅमसेस चतुर्थ याच्या ममीमध्ये तर कांद्याचे अवशेष देखील सापडले आहेत.

    इतकंच नव्हे तर यापूर्वीच्या संस्कृतीमध्ये स्त्रिया  पूजेसाठी आणि अंत्यसंस्कारासाठी कांद्याचा वापर करत असत. तसेच गरोदरपणात बाळाच्या जन्मानंतर जास्त त्रास झाल्यावर  आईवर कांद्याचा उपचार केला जातो. तसेच महिलांशिवाय जनावरांवरसुद्धा कांद्याचा उपयोग केला जातो.