व्यायामात ‘ग्रीन थेअरपीचा’ समावेश करा ; अन ‘हे’ बदल अनुभवा

नियमितपणे १५- २० मिनिटे गवतावर अनवाणी चालण्याचे तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे मिळून जातात. आरोग्य तज्ज्ञाच्या मते नियमितपणे गवतावर चालण्याने तुमची दृष्टी सुधारण्याबरोबच तणाव दूर होण्यासही मदत होते .

  पुणे: सकाळी गवतावर चालण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत. दररोज सकाळी लवकर उठल्यावर नियमितपणे १५- २० मिनिटे गवतावर अनवाणी चालण्याचे तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे मिळून जातात. आरोग्य तज्ज्ञाच्या मते नियमितपणे गवतावर चालण्याने तुमची दृष्टी सुधारण्याबरोबच तणाव दूर होण्यासही मदत होते. आणखी कोणते फायदे वाचा मुद्यांच्या स्वरूपात…

  सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालताना पायाच्या पंजाला गवतांमुळे ऍक्युप्रेशर व डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते

  सकाळी दवाने भिजलेल्या गवतावर चालाल्यामुळे पायाखालच्या मऊ पेशींना जोडलेल्या कोशिकांचा व्यायाम होऊन मेंदूला आराम मिळण्यास मदत होते.

  अनवाणी पायांनी चालल्यानं पाय आणि गुडघ्याचे स्नायू मोकळे होतात आणि पायांना आराम मिळतो

  अनवाणी पायांने चालण्याने मनाला देखील विश्रांती मिळते. सकाळचा प्रसन्न कारणारा सूर्य प्रकाश, स्वच्छ ताजी हवा मनाला ताजे करते. यामुळे दिवसभर प्रसन्न राहण्यास मदत होऊन व्यक्ती मानसिक तणाव सारख्या व्याधींपासून दूर राहतो.

  मधुमेह रुग्णांसाठी गवतावर अनवाणी पायांनी चालण्यामुळं अनेक फायदे होतात. गवतावर चालण्यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होऊन, व्याधीवर मात करण्यास मदत होते.

  सकाळी आपले शरीर बर्निंगच्या मोडमध्ये असते. अशावेळी अनवाणी पायांनी चालण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

  आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ एन्डोक्रिनोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, दिवसा व्यायाम करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. सकाळी वॉक घेण्यामुळे आपले वजन कमी होते.