Increased risk of heart attack in December; Revealed in research

आपल्या शरीराशी संबधित असे अनेक आजार आहेत ज्यावर मात करणे आपल्याला कठीण जाऊ शकतो. हृदयविकार हा असाच एक धोकादायक आजार आहे. मात्र स्वीडनमध्ये यावर आता संशोधन करण्यात आले. त्या संशोधनात नेमके कोणत्या दिवशी आणि महिन्यात हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो हे समोर आले आहे.

    दिल्ली : आपल्या शरीराशी संबधित असे अनेक आजार आहेत ज्यावर मात करणे आपल्याला कठीण जाऊ शकतो. हृदयविकार हा असाच एक धोकादायक आजार आहे. मात्र स्वीडनमध्ये यावर आता संशोधन करण्यात आले. त्या संशोधनात नेमके कोणत्या दिवशी आणि महिन्यात हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो हे समोर आले आहे.

    हार्ट अ‍ॅटॅकचे महत्वाचे कारण म्हणजे तणाव. डायबेटीस असणाऱ्या रुग्णांना तर हार्ट अ‍ॅटॅकचा धोका सर्वात जास्त असतो. या संशोधनात तब्बल 1.5 लोकांवर संशोधन करण्यात आले. या रिसर्चनुसार, सोमवारी हार्ट अ‍ॅटॅक येण्याची शक्यता जास्त असते. इतर दिवसांच्या तुलनेत 11 टक्के सोमवारी हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण जास्त असते. तरुण तसेच नोकरीधंदा करणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण जास्त असते.

    वर म्हटल्याप्रमाणे तणावाचा हार्ट अ‍ॅटॅकशी जास्त संबध असतो. सोमवारी कोणत्याही ऑफिसचा पहिला दिवस असतो. त्यावेळी सहाजिकच कामाचा ताण जास्त असतो. त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी असल्याचे समोर आले. तर महिन्यांचे बोलायचे झाल्यास डिसेंबर महिन्यामध्ये हार्टअ‍ॅटॅकचे प्रमाण जास्त असते. तर जून महिन्यात कमी असल्याचे दिसून येते. हे सर्व जरी खरे असले तरी उत्तम जीवनशैली, योग्य डाएट आणि औषधोपचार यांनी हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी होतो.