‘आयोडीन’ हे स्तनपान माता व बाळासाठी उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली

  • ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट २०२० नुसार मातेचं स्तनपान मुलांना अमृत समान
  • बाळाला स्तनपान केल्यामुळे आईला देखील अनेक आरोग्यदायी लाभ मिळतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज निघून जाण्यात मदत मिळते, तसेच स्तन व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. बाळांना अतिशय आदर्श पोषण मिळते जे त्यांच्या वाढीसाठी खूप गरजेचे असते. आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज असतात ज्या बाळाच्या शरीराला विषाणू व जंतुंविरोधात लढण्यात मदत करतात,

स्तनपानसंबंधीचे विविध गैसमज दूर करण्यासाठीच ऑगस्ट महिन्याचा पहिला सप्ताह ‘स्तनपान जागृती सप्ताह’ म्हणून पाळला जातो. तेंव्हा आयोडीन आणि स्तनपान यांचा एक विशिष्ट संबंध आहे महिलांना स्तनपान आणि आयोडीनच्या संबंधीच्या विविध मुद्द्यांची घेतलेली ही माहिती.

ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट २०२० नुसार बाळ १ किंवा २ वर्षांचे होईपर्यंत त्याला स्तनपान करवणे हे शहरी भागांमध्ये किंवा अधिक शिक्षित मातांच्या बाबतीत सर्वसामान्यतः आढळून येत नाही. तर दुसरीकडे अत्यंत गरीब कुटुंबे, ग्रामीण भाग किंवा कमी शिक्षित माता आपल्या बाळांना वरचे जेवण आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देण्याचे प्रमाण फार कमी असते. 

बाळ जन्माला आल्यानंतरचे काही महिने, त्याला आईच अंगावरच दूध मिळण हा त्याचा हक्कच आहे आणि त्याच्या सम्पूर्ण वाढीसाठी ते आवश्यक आहे. मात्र कधी गैरसमजामुळे आई -बाळाच्या या स्तनपान प्रक्रियेत अडथळे येतात. स्तनपानामुळे बाळांना सर्वोत्तम पोषण मिळते. त्याचप्रमाणे आयोडीन हे देखील आहारातील अत्यावश्यक पोषक तत्व आहे, खासकरून लहान बाळे व गर्भवती महिलांच्या आहारात आयोडीनचा समावेश नियमितपणे आणि योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. चयापचय क्रिया, शरीराची वाढ आणि विकास यावर नियंत्रण ठेवणाऱ्या थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आयोडीन आवश्यक असते.

टाटा न्यूट्रीकॉर्नरच्या पोषण तज्ञ श्रीमती कविता देवगण यांनी सांगितले की, “बाळ कमीत कमी दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान गरजेचे आहे, त्यामुळे बाळाचे विविध प्रकारच्या कुपोषणापासून संरक्षण होते. आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी स्तनपान अतिशय लाभकारी आहे. स्तनपानामध्ये बाळांना आईच्या दुधातून आयोडीन मिळत असल्याने नंतरच्या वर्षांमध्ये या मुलांचा बुद्ध्यांक वाढण्याशी देखील स्तनपान निगडीत आहे. त्यामुळे गरोदरपणामध्ये महिलांच्या शरीराची आयोडीनची गरज वाढलेली असते, त्यांच्या नेहमीच्या आहारातून ती पूर्ण होऊ शकत नाही.  आयोडीनची कमतरता थोडी जरी असली तरी बाळाच्या मेंदूच्या विकासाला धोका उत्पन्न होऊ शकतो. पुरेशा प्रमाणात आयोडीनयुक्त मीठ किंवा ज्यामध्ये आयोडीन असते असे पदार्थ म्हणजे मासे आणि दुग्धजन्य उत्पादनांचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात करून महिलांनी आपल्या शरीराची आयोडीनची गरज पूर्ण केलीच पाहिजे.” 

गरोदर राहण्याच्या आधी आणि गरोदर असताना आहार, जीवनशैली यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यावर खूप भर दिला जातो.  चांगला आहार, भरपूर आराम, कमीत कमी ताणतणाव आणि निरोगी वातावरण हे सर्व घटक निरोगी बाळ जन्माला येण्यात योगदान देत असतात. परंतु गर्भाशयात असताना बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आयोडीन ही तितकेच बाळाला गरजेचे आहे हे बहुतांश मातांना माहित नसते. गरोदरपणामध्ये स्त्रीच्या शरीराची आयोडीनची गरज लक्षणीय प्रमाणात वाढते कारण गर्भाला देखील पुरेशा प्रमाणात आयोडीन हवे असते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यांपासूनच त्यांच्या शरीराची आयोडीन आणि थायरॉईड हार्मोन्सची मागणी वाढलेली असते, आयोडीनची कमतरता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या हे टाळायचे असेल तर आयोडीन अतिरिक्त प्रमाणात पुरवले जाण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांनुसार सर्व गर्भवती व स्तनपान करीत असलेल्या मातांना दररोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळालेच पाहिजे (२५० मायक्रोग्रॅम्स).

बाळाला स्तनपान केल्यामुळे आईला देखील अनेक आरोग्यदायी लाभ मिळतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज निघून जाण्यात मदत मिळते, तसेच स्तन व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. बाळांना अतिशय आदर्श पोषण मिळते जे त्यांच्या वाढीसाठी खूप गरजेचे असते. आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज असतात ज्या बाळाच्या शरीराला विषाणू व जंतुंविरोधात लढण्यात मदत करतात, त्यांना ऍलर्जी, कानातील संसर्ग, श्वसनाचे आजार, डायरिया असे आजार होण्याचा धोका कमी होतो. एकंदरीत स्तनपान करणाऱ्या बाळांची तब्येत उत्तम राहते, त्यांना वारंवार डॉक्टरकडे न्यावे लागत नाही.

चांगली बातमी अशी की नियमितपणे स्तनपान केल्यामुळे स्तन, गर्भाशय कर्करोग, टाईप २ मधुमेह होण्याचा आणि गरोदरपणातील आजारामुळे माता मृत्यू पावण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे दररोजच्या जेवणात चांगल्या दर्जाचे उत्तम आयोडीनयुक्त मीठ वापरल्याने आयोडीन कमतरता देखील सहज टाळता येऊ शकते.