आहारातील ‘याचा’ समावेश ठरतोय कोरोनावर रामबाण उतारा

कडकनाथ कोंबडीचे मांस, अंडी आणि सूप कोविडोत्तर रुग्णांसाठी फायदेशीर. हे कोलेस्टेरॉल कमी करते आणि प्रथिने, जीवनसत्त्वे, कर्बोदके मिळण्यासही मदत होते. याशिवाय चरबीचे प्रमाणही कमी असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील सुधारते.

    मध्यप्रदेश: मध्य प्रदेशातील झाबुआची ओळख बनलेला कडकनाथ कोंबडा आता कोरोनाशी लढायला उपयुक्त ठरू शकत असल्याचा दावा केला जातोय झाबुआ कडकनाथ संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि आरोग्य संशोधन विभाग (डीएचआर) यांना लिहिलेल्या पत्रात हा दावा केला गेला आहे. कोरोनाबाधित किंवा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या आहारात कडकनाथ कोंबडीचा समावेश केल्याने त्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    कडकनाथ कोंबडीचे मांस, अंडी आणि सूप कोविडोत्तर रुग्णांसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकतात. हे कोलेस्टेरॉल कमी करते आणि प्रथिने, जीवनसत्त्वे, कर्बोदके मिळण्यासही मदत होते. याशिवाय चरबीचे प्रमाणही कमी असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील सुधारते. म्हणूनच, रुग्णांच्या आहारात याचा समावेश केला पाहिजे , असे त्यांनी म्हटले आहे

    आयसीएमआर आणि डीएचआरला लिहिलेल्या पत्रात कृषी विज्ञान केंद्र झाबुआ यांनी सुचवले आहे, की कडकनाथ कोंबडीचे मांस, त्याची अंडी यांचा आहारात समाविष्ट केला जाऊ शकतो. यात इतर जीवनसत्त्वांसह आवश्यक घटक, पीयूएफए, डीएचए, झिंक, लोह, व्हिटॅमिन सी, आवश्यक असतात. जी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात ही मोठी भूमिका बजावू शकते.

    यापूर्वीही बीसीसीआयला एक पत्र पाठवून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आहारात कडकनाथचा समावेश करण्याबाबत विचारणा केली होती. मात्र त्या पत्राचे कोणतेही उत्तर बीसीसीआयकडून देण्यात आलेले नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कडकनाथला आपल्या रांचीच्या शेतात वाढवण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मचा व्यवहार केला होता. पण त्यानंतर फ्लूने कोंबड्यांचा बळी पडल्याने हा व्यवहार मागे पडला.