हृदयाला ठेवा चिरतरुण; वापरा ‘या’ सोप्या टिप्स

चुकीच्या सवयींमुळे हृदयरोगांचे प्रमाण वाढत आहे. जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

    अलिकडे हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. पूर्वी वयस्कर लोकांना होणारे हृदयरोग आता तरुणांमध्ये सुद्धा दिसू लागले आहेत. विशेषकरून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयरोग होण्याची कारणे अनेक आहेत. एकूणच जीवनशैली यासाठी खूप मोठ्याप्रमाणात जबाबदार असते. चुकीच्या सवयींमुळे हृदयरोगांचे प्रमाण वाढत आहे. जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण काही खास माहिती घेणार आहोत.

    काय खावे, काय खाऊ नये
    1 जेवताना वरून मीठ घेऊ नका. हे घातक आहे. फास्टफूड टाळा. मिठामुळे हृदयाचे नुकसान होते. मीठ आणि साखरेचे सेवन कमीत कमी करा.
    2 कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खा. फास्टफूड आणि जंकफूड फार कमी खा. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो. एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नका.
    3 पांढऱ्या साखरेऐवजी ब्राऊन शुगरचा वापर करू शकता. नॉन-रिफाईंड गूळ वापरा.
    4 आरोग्य आणि हृदय चांगले ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतात ती वेगवेगळी फळे 5 वेगवेगळ्या हिरव्या भाज्या, सुकामेवा नट्स आणि सीडस म्हणजेच, बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, कलिंगड इत्यादी खा.
    5 दूध, दही, ताक सेवन करा. ग्रीन, ब्लॅक टीचे सेवन करा. यामुळे हृदय निरोगी राहते.
    6 डबाबंद पदार्थ खाऊ नका. रेडी टू इट म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेटमधील ज्यूस, कोल्ड्रिंक टाळा.