girl dreaming

स्वप्नांचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे. या शास्त्रानुसार स्वप्नांचा आपल्या खऱ्या आयुष्यासोबत खूप जवळचा संबंध आहे. कोणत्या स्वप्नाचा काय अर्थ होतो, हे आपण आज जाणून घेऊयात.

  जेव्हा आपण एखादे स्वप्न बघतो(dream) तेव्हा ते सारखे सारखे आठवल्याने आपण दिवसभर टेन्शनमध्ये राहतो.आपण घरच्यांना विचारतो की, मला स्वप्नामध्ये(meaning of dream) काल विचित्र गोष्ट दिसली. त्याचा अर्थ काय असेल ? हा स्वप्नाविषयीचा प्रश्न मनात तसाच रेंगाळत राहतो.(dream analysis) आपल्याला त्याचे उत्तर मिळत नाही. स्वप्नांचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे. या शास्त्रानुसार स्वप्नांचा आपल्या खऱ्या आयुष्यासोबत खूप जवळचा संबंध आहे. कोणत्या स्वप्नाचा काय अर्थ होतो, हे आपण आज जाणून घेऊयात.

  • स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला बहरलेली शेती दिसली तर तुमच्यासाठी हा चांगला संकेत आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे, असा या स्वप्नाचा अर्थ होतो.
  • असे म्हटले जाते की, तुम्हाला स्वप्नामध्ये आनंदी आणि हसणारी महिला दिसली तर धन लाभ होण्याची शक्यता आहे.
  • जर स्वप्नामध्ये तुम्ही सोन्याची अंगठी घातलेली आहे, असं तुम्हाला दिसलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
  • स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये परी दिसणं हा चांगला संकेत आहे. स्वप्नामध्ये परी दिसल्यास कौटुंबिक कलहातून मुक्ती मिळते. चांगली वार्ता कानावर पडते.
  • असं म्हटलं जातं की जर तुम्हाला स्वप्नामध्ये मृत व्यक्ती कापड किंवा कोणते फळ देताना दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच संतान प्राप्ती होणार आहे.
  • स्वप्नामध्ये इमारत तयार होताना दिसल्यास तुमची लवकरच प्रगती होणार आहे, असे समजा.तुम्हाला धन लाभ होणार आहे हे नक्की.
  • तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही आत्महत्या करत आहात असं दिसल्यास तुम्ही घाबराल मात्र स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न शुभ मानले जाते.
  • तुम्हाला स्वप्नामध्ये गुलाब दिसल्यास तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, हे समजा.