cucumber-seeds

काकडीच्या बियांमुळे पोटाच्या समस्या, वजनाची समस्या आणि मानसिक समस्याही दूर होतात. जाणून घेऊयात काकडीच्या बियांचे(Use of Cucumber Seeds) फायदे.

  उन्हाळ्यात(summer) काकडी(Cucumber) खाणे आरोग्यासाठी(Health) फायदेशीर ठरते. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेलच की काकडी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. तसेच अनेक समस्या दूर होतात. मात्र काकडीच्या बिया(Cucumber Seeds) खाल्ल्यानेही शरीराला फायदा होतो.

  काकडीच्या बियांमध्ये(Cucumber Seeds are useful) अँटीऑक्सिडंट्स, खनिज, पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे काकडीच्या बिया खाल्ल्याने केस आणि त्वचा चांगली होते. काकडीच्या बियांमुळे पोटाच्या समस्या, वजनाची समस्या आणि मानसिक समस्याही दूर होतात. जाणून घेऊयात काकडीच्या बियांचे फायदे.

  • आहारतज्ञांच्या मते काकडीच्या बियांमुळे केस गळणे कमी होते. कारण यात सल्फर असते. सल्फरमुळे केस लांब आणि चांगले होतात.काकडीचा ज्यूस प्यायल्यामुळे केसांच्या वाढीला मदत होते.
  • काकडी सौंदर्य वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरते. उन्हाळ्यामध्ये होणारे सनबर्न, ड्राय स्किन आणि टॅनिंगच्या समस्या काकडीच्या बियांमुळे दूर होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे कमी होते.

   फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

   View Results

   Loading ... Loading ...
  • काकडीच्या बियांमध्ये अशा रसायनाचा समावेश आहे ज्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात. तोंडाची दुर्गंधी निघून जाते. ज्यांच्या तोंडाला वास येत असेल त्यांनी काकडीच्या बियांचे सेवन आवर्जून करावे.
  • तज्ञांच्या मते, काकडीच्या बियांमध्ये अनेक अशी पोषकतत्वे आहेत ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.डोळ्यांची जळजळ आणि सूज कमी होते.
  • मासिक पाळीच्या समस्या कमी करण्यासाठी,लघवीच्या समस्या कमी करण्यासाठीही काकडीच्या बिया उपयुक्त आहेत.