हास्याने वाढते आकलन क्षमता

या प्रयोगात त्यांना आवाक्यापलीकडे असलेले खेळणे एका साधनाने मिळवायचे होते. एका गटात प्रौढांनी नुसते खेळणे घेऊन त्याच्याशी खेळले, दुसऱ्या गटात प्रौढांनी ते खेळणे घेऊन जमिनीवर फेकले, तयमुळे निम्मी बालके हसली.

  मुले नवीन काही शिकण्यास राजी नसतील, तर त्यांना विनोद सांगून हसवा म्हणजे तुमचे काम सोपे होईल, असा सल्ला फ्रेंच वैज्ञानिकांनी दिला आहे. विनोद व त्यापाठोपाठ फुलणारे हास्य यामुळे मुलांची आकलन क्षमता वाढते, असे संशोधन आतापर्यंत मोठय़ा मुलांच्या बाबतीत झाले होते पण आता या वैज्ञानिकांनी बालकांमध्येही ते खरे आहे हे दाखवणारा प्रयोग केला. अठरा महिन्यांच्या मुलांची निवड या प्रयोगासाठी करण्यात आली होती.

  या प्रयोगात त्यांना आवाक्यापलीकडे असलेले खेळणे एका साधनाने मिळवायचे होते. एका गटात प्रौढांनी नुसते खेळणे घेऊन त्याच्याशी खेळले, दुसऱ्या गटात प्रौढांनी ते खेळणे घेऊन जमिनीवर फेकले, तयमुळे निम्मी बालके हसली. जेव्हा वैज्ञानिकांनी माहितीचे विश्लेषण केले. ज्या गटातील बालके हे खेळणे जमिनीवर टाकल्याने हसली होती त्यांच्यात खेळणे मिळवण्याची कृती तुलनेने यशस्वीपणे घडली, ज्या मुलांच्या गटाला प्रौढांनी काहीतरी वेगळी कृती करून हसवले नव्हते त्यांच्यात खेळणे मिळवण्याची क्रिया अवघड गेली. विनोद व त्यानंतरचे हसणे याचा बालकांच्या काही कृती शिकण्याशी काय संबंध असतो हे समजलेले नाही पण संशोधकांच्या मते त्याची दोन कारणे असावीत, एक म्हणजे संयम.

  त्यात विनोदाने शिकण्यास मदत होते असे नाही तर हसरी मुले किंवा एखाद्या कृतीला तसा प्रतिसाद देणारी मुले आजूबाजूच्या वातावरणाशी लगेच जुळवून घेऊ शकतात त्यामुळे ते खेळणे मिळवण्याची कृती यशस्वीपणे करू शकतात. हसणाऱ्या मुलांची सामाजिक कौशल्ये व आकलन क्षमता जास्त असते. त्यांना इतरांशी सहजतेने वागता येते व ते काही कृतींची नक्कल करू शकतात. दुसरे स्पष्टीकरण म्हणजे मेंदूचे रसायनशास्त्र हे आहे. हसणे, प्रयोगकर्त्यांशी एकरूप होणे यांसारख्या सकारात्मक क्रियांनी मेंदूत डोपॅमाइनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मुलांच्या शिकण्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे येथे जो परिणाम दिसतो तो सकारात्मक भावनांचा परिणाम असतो त्याचा विनोद किंवा हसण्याशी थेट संबंध नाही, असेही काही संशोधकांचे मत आहे. ‘कॉग्निशन अँड इमोशन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे

  *  सकारात्मक भावन वाढतात

  * डोपॅमाइनचे प्रमाण वाढते

  * खूप गंभीर वातावरणात मुले नवीन काही शिकत नाहीत.