पुदिन्याचा आहारात करा समावेश; जाणून ‘हे’ वैशिष्टयपूर्ण गुणधर्म

कोरोनासारख्या संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध या पदार्थांचा आहार समावेश करण्यास सांगितले.विविध पौष्टिक पदार्थ खात  असताना आहार सातत्याने पुदिन्याचा समावेशही नक्कीच करा.

  मुंबई: सुदृढ आरोग्यासाठी आहारामध्ये पुदिन्याचा समावेश अनेकदा केला जातो. जेवणातही पुदिन्याच्या चटणी खाण्याला प्राधान्या दिले जाते. कोरोनासारख्या संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध या पदार्थांचा आहार समावेश करण्यास सांगितले. विविध पौष्टिक पदार्थ खात  असताना आहार सातत्याने पुदिन्याचा समावेशही नक्कीच करा.

  पुदिन्याच्या पानांमध्ये कॅलरीचे प्रमाणकमी असते, या प्रोटीन व गुड फॅट अधिक असतात.

  पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी चे प्रमाण अधिक असते.

  विशेष म्हणजे पुदीनामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

  पुदिन्याची पाने पाण्यात मिक्सकरून ते पाणी उकळून पिल्यास वजन कमी करण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत होत.

  पुदिन्याच्या समावेश असलेला आहार घेतलेल्याने चांगल्या पद्धतीनं अन्न पचन होण्यास मदत होते.

  पुदिन्यामुळे तोंडाचे आरोग्य चांगले राहते, तोंडाच्या आतील भागात जंतूंची वाढ होऊ देत नाही. याशिवाय दातांवरील डाग साफ करण्यास मदत होते.

  पुदिन्यामुळे नाक, गळा आणि फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

  पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. याच गुणधर्मामुळे पुदीनाचे सेवन केल्यानंतर अगदी खूप वर्षांपासून त्रास देत असलेल्या खोकल्यापासून आराम मिळतो.