औषधे घेताना अनेकजण करतात ‘या’ चुका; तुम्हीसुद्धा करत असाल तर लगेच व्हा सावध!

बऱ्याचदा डॉक्टरांनी सांगूनही बरेच जण औषधाची मात्रा उपाशी पोटी घेतात. ज्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे असे करणे टाळले पाहिजे.

  सध्या कोरोनामुळे (Covid 19) तसेच या महामारीच्या अगोदरही बरेच जण औषधांचा (Drugs) डॉक्टरांचा सल्ला न घेता वापर करताना दिसून येतात. सर्दी किंवा ताप असेल तर घरच्या घरी काही गोळ्या खाणे किंवा औषधे घेण्यावर बऱ्याच जणांचा जोर दिसतो. पण अशा पद्धतीने औषधांचे सेवन केल्याने बऱ्याच जणांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले आहे. तसेच काही जणांनी असे ओव्हरडोस घेतल्याने त्यांचे प्राणही गेले आहेत. त्यामुळे औषधांचा असा वापर धोकादायक आहे.

  प्रमाणापेक्षा जास्त डोस घेणे
  कोणत्याही आजारात डॉक्टरांनी दिलेली औषधे ठराविक काळापर्यंत घेण्यास सांगितले जातात. पण बरेच जण तोच त्रास जर नंतर सुरू झाला तर ती औषधे पुन्हा घेतात, जे धोकादायक असतात. कोणत्याही गोळ्या किंवा औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. एका रिपोर्टनुसार भारतात सर्वात जास्त अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. तसेच प्रमाणापेक्षा जास्त डोस घेणे टाळले पाहिजे.

  प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेऊ नये
  डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषधे घेतल्यास त्याची मोठी किंमत चूकवावी लागू शकते. तसेच एका आजारी असताना एकापेक्षा जास्त डॉक्टरांनी सुचवलेली औषधे घेऊ नयेत. त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. कोणत्याही आजारात स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळले पाहिजे.

  राहिलेली औषधे घेणे टाळले पाहिजेत
  पूर्वी एखाद्या आजारात वापरलेली औषधे पुन्हा वापरू नयेत. त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. कोणतेही औषध रुग्णाची त्यावेळेसची स्थिती पाहून दिली जातात. त्यामुळे राहिलेली औषधे नंतर वापरू नये. तसेच सामान्य औषधेही घेणे टाळले पाहिजेत.

  औषधांचा कोर्स पूर्ण केला पाहिजे
  एखाद्या आजारात डॉक्टरांनी दिलेली औषधे बरं वाटू लागायला लागल्यानंतर बरेचजण औषधांचा कोर्स पूर्ण करत नाहीत. पण असं करणे धोकादायक ठरू शकते त्यामूळे डॉक्टरांनी सांगितलेला गोळ्यांचा किंवा औषधांचा कोर्स पूर्ण केला पाहिजे.

  उपाशीपोटी मात्रा
  बऱ्याचदा डॉक्टरांनी सांगूनही बरेच जण औषधाची मात्रा उपाशी पोटी घेतात. ज्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे असे करणे टाळले पाहिजे.