पुरुषांची प्रेग्नन्सी टेस्ट करून ओळखता येतोय ‘या’ प्रकारच्या कर्करोगाचा धोका

विवाहित पुरुषाने जर प्रेग्नसी टेस्टकिटमधील स्ट्रीपवर युरिन (Urine) केली तर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आल्याच आपण ऐकले असेल. मात्र याचा अर्थ तो मूल जन्माला घालणार असा नसून, तो टेस्टीक्युलर कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये आहे असे स्पष्ट होते.

    पुरुषांची प्रेग्नन्सी टेस्ट …वाचून कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. प्रेग्नन्सी टेस्टही महिलांसाठी असल्याचे आपण पाहिले आहे. काहीवेळा चित्रपटांमध्ये आपण पुरुष गरोदर राहिल्याचे पाहिले आहे. पुरुष बाळाला जन्म देऊ शकतात का याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसते. पुरुष प्रेग्नंट होत असोत किंवा नसोत हा मुद्दा बाजूला ठेवा पण तरीही पुरुषांनीही महिलांप्रमाणे प्रेग्नन्सी चाचणी करणं खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती नसेल पण जर पुरुषांनी प्रेग्नन्सी टेस्ट केली तर त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येईल.

    एखाद्या पुरुषाची प्रेग्नसी चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर अशी शंका मनात निर्माण होऊ शकते. परंतु अशी चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली तरी त्याचा अर्थ तो पुरुष मूल जन्माला घालणार आहे असा होत नाही. तर हे पुरुषाला होणाऱ्या गंभीर आजाराचं लक्षण असल्याची शक्यता जेंटसाईड डॉट कॉमच्या वृत्तामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.  ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर संबंधित पुरुषाला टेस्टीक्युलर कर्करोगाचा (Testicular Cancer) संकेत आहे.

    टेस्टीक्युलर कर्करोगाचा हा पुरुषांना होणाऱ्या कॅन्सरच्या विविध प्रकारांच्या तुलनेत १ टक्के होणारा कॅन्सर मानला जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. टेस्टीक्युलर कर्करोगाच्या काही प्रकारांमध्ये एक प्रकारचे हार्मोन प्रवाहित होते. त्यामुळे एखाद्या पुरुषाने प्रेग्नसी टेस्ट केली आणि या टेस्टमधून संबंधित पुरुषाच्या युरिनमध्ये हे हार्मोन आढळून आले तर त्या पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणे शक्य आहे. प्रेग्नसी टेस्टच्या माध्यमातून टेस्टीक्युलर कॅन्सरच्या काही प्रकारांची तपासणी करणेदेखील शक्य आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की दर महिन्याला टेस्ट किटच्या स्ट्रिपवर युरिन करणे आवश्यक आहे.

    रिपोर्टनुसार केल्सी-सेबोल्ड क्लिनिकचे यूरोलॉजिस्ट डॉ. फिलीप यांनी सांगितले की विवाहित पुरुषाने जर प्रेग्नसी टेस्टकिटमधील स्ट्रीपवर युरिन (Urine) केली तर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आल्याच आपण ऐकले असेल. मात्र याचा अर्थ तो मूल जन्माला घालणार असा नसून, तो टेस्टीक्युलर कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये आहे असे स्पष्ट होते.