मास्कच्या भरवशावर राहू नका, हेदेखील करा, नव्या प्रयोगाअंती शास्त्रज्ञांचा निष्कर्ष

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला देशातील आरोग्य यंत्रणा देत आहेत. मात्र तेवढंच पुरेसं नसल्याचं आता सिद्ध झालंय. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन्ही बाबींचा अवलंब केला, तरच कोरोनापासून पूर्ण संरक्षण मिळू शकतं, हे प्रयोगाअंती आता स्पष्ट झालंय. फिजिक्स ऑफ फ्लुईड्स या एआयपी पब्लिशिंगनं प्रकाशित केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कचा उपयोग करून संशोधन केलंय.

मास्कमुळे कोरोनापासून आपलं संरक्षण होतं. मास्क लावल्यामुळे कोरोनाचा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही, असं सांगितलं जातं. मात्र मास्क लावणं पुरेसं नसल्याचं निरीक्षण एका अभ्यासानंतर काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय. एखादी व्यक्ती मास्क लावत असेल आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत नसेल, तर त्या व्यक्तीला कोरोना संसर्गाचा धोका उद्भवू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला देशातील आरोग्य यंत्रणा देत आहेत. मात्र तेवढंच पुरेसं नसल्याचं आता सिद्ध झालंय. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन्ही बाबींचा अवलंब केला, तरच कोरोनापासून पूर्ण संरक्षण मिळू शकतं, हे प्रयोगाअंती आता स्पष्ट झालंय. फिजिक्स ऑफ फ्लुईड्स या एआयपी पब्लिशिंगनं प्रकाशित केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कचा उपयोग करून संशोधन केलंय.

वेगवेगळ्या मटेरियलपासून तयार करण्यात आलेले हे मास्क शिंक किंवा खोकला आल्यावर वेगवेगळ्या ड्रॉपलेट्सना बाहेर जाण्यापासून कसे आणि किती प्रमाणात रोखतात, याचं निरीक्षण या प्रयोगाद्वारे करण्यात आलं. वेगवेगळ्या मटेरियलमध्ये ड्रॉपलेट बाहेर पडण्याची संख्या आणि प्रमाण वेगवेगळं आढळलं. मात्र शंभर टक्के ड्रॉपलेटचं संरक्षण कुठलाच मास्क करू शकत नाही, हे सिद्ध झालं. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल, तर किमान सहा फुटांचं अंतर एकमेकांपासून राखणं गरजेचं असल्याचं या प्रयोगातून समोर आलंय.

विषाणूच्या संसर्गापासून रोखण्यासाठी मास्कचा नक्कीच उपयोग होतो. मात्र लोक एकमेकांच्या अगदी जवळ असतील, तर मात्र मास्क लावूनदेखील कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असं या प्रयोगातील एक शास्त्रज्ञ कृष्णा कोटा यांनी म्हटलंय.