woman

महिलांनी जबाबदाऱ्या सांभाळत आरोग्याची काळजी घेण्याची गरजही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महिलांनो आरोग्य सुदृढ राखा असा संदेश राष्ट्रीय महिला आरोग्य व स्वास्थ्य दिनी(national woman health day) देण्यात आला.

‘कोविड-१९’च्या साथीचा काळ महिलांसाठी विशेष त्रासदायक ठरला आहे. त्यांना घरातून काम करावे लागत आहे आणि घरासाठीही काम करावे लागत आहे. यामध्ये स्वतःची काळजी घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, महिलांनी जबाबदाऱ्या सांभाळत आरोग्याची काळजी घेण्याची गरजही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महिलांनो आरोग्य सुदृढ राखा असा संदेश राष्ट्रीय महिला आरोग्य व स्वास्थ्य दिनी(national woman health day) देण्यात आला.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी ‘राष्ट्रीय महिला आरोग्य व स्वास्थ्य दिवस’ साजरा केला जातो. यासाठी सकारात्मक राहणे आवश्यक असून शिस्तबद्ध दिनक्रम आखणे ही यातील पहिली पायरी आहे. काम संपल्यानंतर काही मिनिटांसाठी विश्रांती घेणे, छंद जोपासणे, वाचन करणे, मन ताजेतवाने होण्यासाठी आवडीच्या गोष्टी करणे. शिवाय आहाराचे ही महत्व आहे. आरोग्य चांगले राखण्यामध्ये आहार फार महत्त्वाचा आहे.

दिवसाच्या सुरुवातीस प्रथिने भरपूर असलेली, पौष्टिक न्याहारी करून तुमच्या चयापचय यंत्रणेला चालना देणे. न्याहारीमध्ये सुकामेवा, दाणे, फळे यांचा समावेश केल्याने कार्यक्षम राहता येईल. चिप्स, गोड पदार्थ खाण्याचा मोह टाळणे, तसेच दिवसभरात किमान ३० मिनिटे तरी व्यायाम करणे. महत्वाचे म्हणजे मानसिक ताण व चिंता कमी करणे. कुटुंब व मित्रपरिवार यांच्यासमवेत काही वेळ घालवून मनावरील ताण कमी करत येतो. मुलांना काही वेळ दिल्याचे समाधानही लाभेल.

तुमच्या घरी बाल्कनी असेल, तर तेथे काही वेळ घालवा. सूर्यप्रकाश व हिरवा निसर्ग पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. व्हिटॅमिन डी’, ‘व्हिटॅमिन बी-१२’, मल्टी-व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळून रोगप्रतिकारक शक्ती व जीवनशक्ती वाढेल. अपुऱ्या, चाळवलेल्या झोपेमुळे मनावरील ताण वाढतो आणि तुमच्या हार्मोन्सवरही परिणाम होतो. कोविड-१९ शी संबंधित नकारात्मक बातम्या सतत बघणे आणि वाचणे टाळा असा सल्ला स्त्रीरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बंदिता सिन्हा यांनी दिला आहे.