नाईट शिफ्ट म्हणजे कर्करोगाला आमंत्रण, नव्या अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

अलिकडेच करण्यात आलेल्या एका नव्या सर्वेक्षणानुसार नाईट शिफ्टमध्ये काम करणे केवळ आरोग्यासाठी धोकादायक असते, एवढेच नव्हे, तर त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचं दिसून आलंय. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढं आलीय. त्यामुळे सलग नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय. 

    लॉकडाऊन काळात बंद असणाऱ्या बहुतांश कंपन्या आता सुरू झाल्या आहेत. घरून काम करणारे कर्मचारी आता कार्यालयात जाऊन काम करू लागले आहेत. अनेक कंपन्या या दिवसरात्र म्हणजेच २४ तास सुरू असतात आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत असतात. त्यातील नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सर्वाधिक तक्रारींना सामोरे जावे असल्याचे यापू्र्वीदेखील दिसून आले आहे.

    अलिकडेच करण्यात आलेल्या एका नव्या सर्वेक्षणानुसार नाईट शिफ्टमध्ये काम करणे केवळ आरोग्यासाठी धोकादायक असते, एवढेच नव्हे, तर त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचं दिसून आलंय. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढं आलीय. त्यामुळे सलग नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय.

    सामान्य शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांपेक्षा नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना वेगळ्या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते, असं या अहवालात म्हणण्यात आलंय. शरीर हे २४ तासांच्या चक्रामध्ये काम करत असतं. निसर्गाच्या नियमानुसार जेवण्याच्या, अन्नपचनाच्या आणि झोपेच्या वेळा शरीराने निर्धारित केलेल्या असतात. मात्र नाईट शिफ्टमध्ये झोपेच्या चक्रात बदल होतो. त्याचा परिणाम कर्करोगाशी संबंधित असलेल्या यंत्रणांच्या क्रियाकल्पावर होतो. त्यामुळेच नाईट शिफ्ट करणाऱ्यांना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते,असं या अहवालात नमूद करण्यात आलंय.

    या प्रयोगासाठी १४ जणांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ७ जणांना दिवसा आणि ७ जणांना रात्रीच्या शिफ्टमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर ते झोपेत असताना त्यांच्या डीएनएत होणारे बदल प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यावेळी नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या डीएनएमध्ये घातक बदल होत असल्याचं दिसून आलं.