सोमवारी हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण जास्त? सिद्धार्थच्या मृत्यूनंतर पुन्हा चर्चेत आला मुद्दा

प्रतिष्ठित असा उप्पारला आणि सुमेया विद्यापीठातील संशोधकांनी हार्ट ॲटॅक स्टडी केसेस संदर्भात खुलासा केला. हे संशोधन अमेरिकन हार्ट जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले आहे. यामागे अशी शक्यता व्यक्त केली गेली आहे की सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो. हा दिवस स्ट्रेसफुल असतो कारण या दिवशी वर्क प्रेशर, एंग्झायटी सर्वाधिक असते. त्यामुळे स्ट्रेस वाढतो आणि वाढलेला स्ट्रेस हार्टॲटॅकला आमंत्रण देतो.

    बिग बॉस सदस्य आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ल याला 2 सप्टेंबर रोजी हार्ट ॲटॅक येऊन त्याचा अचानक मृत्यू झाला. या संबंधाने पुन्हा एकदा हार्ट
    सोमवारी हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण जास्त? ॲटॅक संदर्भात जगभरात होत असलेली विविध प्रकारची संशोधने चर्चेत आली आहेत.

    हार्टॲटॅकम्हणजे एक प्रकारची वैद्यकीय आणीबाणीच. त्वरित मदत मिळाली नाही तर मृत्यूची शक्यता वाढते. हार्टॲटॅक येण्यापूर्वी अनेकदा काही ना काही लक्षणे दिसतात पण ही लक्षणे कशाची हे लक्षात आले नाही तर बिकट परिस्थिती उद्भवते. वेळीच लक्षात आले तर हार्टॲटॅक मधून सुद्धा माणूस बचावू शकतो. स्वीडिश रजिस्ट्रीमध्ये केलेल्या एका अध्ययनात 1 लाख 56 हजार रुग्णाचे अध्ययन केले असता, सोमवारी हार्टॲटॅक येण्याची शक्यता सर्वाधिक असते असे दिसून आले.

    प्रतिष्ठित असा उप्पारला आणि सुमेया विद्यापीठातील संशोधकांनी हार्ट ॲटॅक स्टडी केसेस संदर्भात खुलासा केला. हे संशोधन अमेरिकन हार्ट जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले आहे. यामागे अशी शक्यता व्यक्त केली गेली आहे की सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो. हा दिवस स्ट्रेसफुल असतो कारण या दिवशी वर्क प्रेशर, एंग्झायटी सर्वाधिक असते. त्यामुळे स्ट्रेस वाढतो आणि वाढलेला स्ट्रेस हार्टॲटॅकला आमंत्रण देतो.

    सुटीच्या दिवसात हार्टॲटॅक येण्याचे चान्सेस खुपच कमी असतात. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी वाढणे, उच्च रक्तदाब, स्थूलत्व, मधुमेह ही हार्टॲटॅक येण्याची अन्य कारणे आहेत. नियमित व्यायाम केला तर हार्टॲटॅकचा धोका कमी होतो असेही अभ्यासात दिसून आले आहे.