walk on lawn

चालण्याचा व्यायाम हिरवळीवर (morning walk on garden grass)केल्यास तुमच्या आरोग्यास(health) आणि विशेषतः डोळ्यांसाठी(ear) फारच फायदा होतो. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच(mental and physical health) आरोग्यदायी कारणांसाठी नक्की सकाळी हिरवळी चाला.

  दिवसभर फ्रेश(fresh) राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक(morning walk) करा हा सल्ला तुम्हालाही ठाऊक असेल. मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच आरोग्यदायी ठरतो. मग मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी कारणांसाठी नक्की सकाळी हिरवळी चाला.

  मन शांत राहते
  ताजी हवा, कोवळे ऊन आणि शांत वातावरण सारेच सकाळच्या वेळी प्रसन्न असते. ताज्या हवेतील ऑक्सिजन तुमचे स्वास्थ्य सुधारते, सूर्यप्रकाश प्रफुल्लित करते, व्हिटामिन डीचा पुरेसा पुरवठा करते. तर शांत वातावरण तुम्हाला रिलॅक्स व्हायला मदत करते. या साऱ्यामुळे तुमच्यावरील ताणदेखील हलका होण्यास मदत होते. हिरवळीचा हिरवा रंग शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात.

  शरीर निरोगी होण्यास मदत होते
  पायाच्या तळव्यामध्ये शरीरातील विविध अवयवांचे कार्य निगडीत असते. विशेषतः डोळे, कान, फुफ्फुस, चेहरा, पोट, मेंदू, किडनी यांचे कार्य तळव्याच्या बिंदूंमध्ये असते. त्यामुळे हिरवळीवरून चालताना या अवयवांच्या बिंदूंचा व्यायाम होतो. परिणामी निरोगी स्वास्थ्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो हिरवळीवर चालल्याने नसा मोकळ्या होतात. तसेच शरीरातील अनेक नर्व्हच्या एंडींग़ मोकळ्या झाल्याने शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते. आपण चालताना शरीराचा सारा भार आपल्या पायांवर असतो. विशेषतः पहिल्या बोटांवर ! डोळ्यांचे आरोग्य सुधारणारे रिफ्रॅक्सोलॉजी प्रेशर पॉईंटस दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटामध्ये असते. त्यामुळे हिरवळीवर चालण्याचा सर्वाधिक फायदा डोळ्यांसाठी होतो.

  इलेक्ट्रिकल एनर्जी न्युट्रलाईज होते
  नॅचरोपॅथी ही उपचारपद्धती निसर्गातील पंचभूतांशी निगडीत असते. त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी. त्यातून येणाऱ्या मॅगनेटिक व्हेव्जमध्ये काही ऊर्जा सामावलेली असते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पृथ्वी आणि या मॅगनेटीक व्हेव्जच्या एकत्र येण्याने शरीरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. परिणामी यातून उद्भवणारे आजारही रोखण्यास मदत होते.

  कोवळ्या उन्हाचा आनंद घ्या
  सकाळी जिममध्ये घाम गाळण्याऐवजी हिरवळीवरून चालल्याने कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आनंद घेता येतो. सूर्य हा ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे दिवसभर लागणारी ऊर्जा उत्तेजित करण्यास सकाळी हिरवळीवर चालणे फायदेशीर ठरू शकते. कोवळ्या उन्हामुळे शरीर डिसइन्फेक्ट होण्यास, स्नायू आणि नर्व्ह्स बळकट होण्यास मदत होते. शरीराला ‘व्हिटामिन डी’ चा पुरवठा होतो.

  चालण्याची योग्य वेळ
  सकाळी ६.३० ते ९ आणि सायंकाळी ४.३०- ५ ते ६.३० पर्यंत चालणे फायदेशीर ठरू शकते. मात्र दुपारच्या कडक उन्हांत फिरणे टाळा. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते.

  व्हिटामिन डीची कमतरता टाळा
  आजकाल ठिसूळ सांध्यांमुळे अनेक विकार वाढतात. याचे प्रमुख कारण सूर्यप्रकाशाचा प्रभाव आहे. त्यामुळे सकाळी मोकळ्या हवेत चालल्याने आपोआपच शरीराला आवश्यक व्हिटामिन डी मिळते. यामुळे हाडाचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते. गर्भवती स्त्रियांसाठी हे व्हिटामिन डी फारच आवश्यक आहे.