मल्टीटास्किंग मेंदूसाठी घातक; संशोधकांचा इशारा

‘मल्टीटास्किंग’साठी नव्हे; तर ‘मोनोटास्किंग’साथी अनुकूल असल्याने ‘मल्टीटास्किंग’ हे मेंदूला हानिकारक आहे; असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

वॉशिंग्टन. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि प्रचंड धावपळीच्या काळात ‘मल्टीटास्किंग’ हा एक परवलीचा शब्द बनला आहे. अनेकांना आपल्या ‘मल्टीटास्किंग’च्या क्षमतेचा अभिमान असतो. मात्र प्रत्यक्षात मानवी मेंदूची रचना ‘मल्टीटास्किंग’साठी नव्हे; तर ‘मोनोटास्किंग’साथी अनुकूल असल्याने ‘मल्टीटास्किंग’ हे मेंदूला हानिकारक आहे; असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

मानवी मेंदूला एकावेळी एकच काम करण्याची नैसर्गिक क्षमता मिळाली आहे. एका वेळी अनेक कामे करणे हे अनैसर्गिक असून त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते; असे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना आढळून आले आहे.

छोटी छोटी कामे पुरा केल्याने आपल्या मेंदूमध्ये ‘डोपामाईन’ हे हार्मोन निर्माण होते. हे हार्मोन सुखद संवेदना निर्माण करते. त्यामुळे एसएमएस, ई मेल करणे, ट्विट करणे; अशी किरकोळ कामे केल्याने हे हार्मोन तात्कालिक सुख देत असले तरी प्रत्यक्षात आपण कोणतेही मोठे, महत्वाचे काम केलेले नसते; असे इन्स्टिट्यूटचे संशोधक अर्ल मिलर यांनी सांगितले.

मल्टीटास्किंगमुळे मेंदूची विचारांना सुसंगती देण्याची आणि नको असलेले विचार, माहिती काढून टाकण्याची क्षमता नष्ट होते. त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि क्षमता कमी होते; असेही त्यांनी सांगितले.