Mythical remedy for youth

प्राचीन पुराणांमध्ये केवळ धार्मिक विषयांचीच नाही तर आरोग्यविषयकही बरीच माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या आधुनिक युगात कामाची धावपळ, अनियमित दिनचर्या, आहार आणि प्रत्येकाच्या पुढे जाण्याची लागलेली ओढ यामुळे अनेक लोकांना कमी वयातच विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणात आहारसंदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास अशक्तपणा, कमजोरीच्या समस्या दूर होऊन व्यक्ती ऊर्जावान राहू शकतो. या उपायांमध्ये सांगण्यात आलेली औषधी बाजारात कोणत्याही मेडिकल दुकानात सहजपणे मिळू शकते.

    मुंबई : प्राचीन पुराणांमध्ये केवळ धार्मिक विषयांचीच नाही तर आरोग्यविषयकही बरीच माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या आधुनिक युगात कामाची धावपळ, अनियमित दिनचर्या, आहार आणि प्रत्येकाच्या पुढे जाण्याची लागलेली ओढ यामुळे अनेक लोकांना कमी वयातच विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणात आहारसंदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास अशक्तपणा, कमजोरीच्या समस्या दूर होऊन व्यक्ती ऊर्जावान राहू शकतो. या उपायांमध्ये सांगण्यात आलेली औषधी बाजारात कोणत्याही मेडिकल दुकानात सहजपणे मिळू शकते.

    जेवणानंतर खावे लोणी

    जेवण केल्यानंतर खडीसाखर आणि लोणी खाणे लाभदायक राहील. या उपायाने पुरुषांची स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला उर्जा मिळते. गायीच्या दुधाचे लोणी असेल तर जास्त उत्तम राहील.

    हिंग, काळ्या मिठाने पोट स्वस्थ

    हिंग, काळे मीठ आणि सुंठचा काढा करून प्यायल्यास पोटाचे आजार दूर होतात. पोट साफ आणि स्वच्छ राहिल्यास शरीर उर्जावान आणि ताकदवान राहते.

    जेवणानंतर खावा गुळ

    गरुड पुराणानुसार जर एखाद्या पुरुषाने दररोज जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्यास त्याला शरीरिक स्वरुपात भरपूर ताकद मिळते. गुळ जुना असेल तर जास्त लाभकारक राहील.

    डोळ्यांसाठी फायदेशीर उपाय

    त्रिफळा चूर्ण आणि मधाचे सेवन केल्यास दीर्घ काळापर्यंत डोळे स्वस्थ राहतील आणि डोळ्यांशी संबंधित छोटे-छोटे आजार दूर राहतील.

    असे तयार करा औषध

    तीळ, अश्वगंधा, काळी तुळस आणि गुळ एकसमान प्रमाणात घेऊन याच्या छोट्या-छोट्या गोळ्या तयार करा. या गोळ्यांचे सेवन केल्यास शरीराला ताकद मिळेल.

    त्वचेची चमक वाढविण्यासाठी

    जवस, उडीद, गहू आणि पिप्पली बारीक कुटून त्यामध्ये तूप मिसळून हे मिश्रण शरीरावर लावा. हा उपाय नियमित केल्यास त्वचा दीर्घ काळापर्यंत चमकदार आणि स्वस्थ राहते.

    दररोज गायीच्या दुधाचे सेवन

    जर एखाद्या व्यक्ती दीर्घ काळापर्यंत वृद्धपणा, रोग, कमजोरीपासून दूर राहू इच्छित असेल तर त्याने नियामिपणे गायीच्या दुधाचे सेवन करावे. दुधामध्ये मध आणि तूप टाकून प्यायल्यास आयुष्य वाढते.

    काही इतर उपाय

    • तुपासोबत त्रिफळा चूर्णाचे सेवन डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
    • दररोज झोपण्यापूर्वी मध आणि तुपाचे सेवन केल्यास शरीराला शक्ती प्राप्त होते.
    • गरुड पुराणानुसार ज्या पुरुषाला ताकदवान होण्याची इच्छा असेल त्याने दररोज खडीसाखर, मध आणि लोणी एकत्र करून सेवन करावे.
    • पिप्पली, लोहचूर्ण, सुंठ, आवळा, काळे मीठ, मध आणि खडीसाखर एकसमान प्रमाणात घेऊन बारीक करा. या मिश्रणाचे सेवन केल्यास व्यक्ती दीर्घ काळापर्यंत ताकदवान राहतो.