national nutrition week

राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्याचा उद्देश लोकांना चांगल्या आहाराचे महत्त्व(Importance Of Nutrition Week) समजावे आणि जनजागृती व्हावी, असा आहे. राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा इतिहास(History Of National Nutrition Week) आपण जाणून घेऊयात.

    दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह(National Nutrition Week)साजरा केला जातो. राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्याचा उद्देश लोकांना चांगल्या आहाराचे महत्त्व(Importance Of Nutrition Week) समजावे आणि जनजागृती व्हावी, असा आहे. राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा इतिहास(History Of National Nutrition Week) आपण जाणून घेऊयात.

    अमेरिकन डायटेटिक असोसिएशनच्या सदस्यांनी आहारशास्त्राच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. पोषण शिक्षणाचा संदेश देण्यासाठी मार्च १९७३ मध्ये त्यांनी राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू केला. १९८० च्या दशकात राष्ट्रीय पोषण सप्ताहासाठी खूप पाठिंबा मिळाला. आधी आठवडाभर चालणारा हा महोत्सव पुढे महिनाभर साजरा होऊ लागला. पुढे भारत सरकारने १९८२ मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह स्मरणोत्सवाची सुरुवात केली. पोषणाविषयी जागरूकता निर्माण कारण्यासाठी आणि प्रत्येकाला त्याचं महत्त्व समजून देण्यासाठी हा सप्ताह सुरु करण्यात आला. तसेच निरोगी जीवनशैली लोकांनी स्वीकारावी यासाठी प्रोत्साहन देण्याची मोहिम या निमित्ताने राबवण्यात आली.

    आपण जर योग्य आहार घेतला तरच आपल्या शरीराचे पोषण होते. चुकीच्या आहारामुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो.  चांगल्या आरोग्यासाठी दररोज संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. राष्ट्रीय पोषण सप्ताहाला दरवर्षी एक थीम ठरवली जाते. राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२१ ची थीम ‘सुरुवातीपासूनच स्मार्ट आहार घेणं’ अशी आहे. तुम्ही स्मार्ट आहार कसा घेता ? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.