woman drinking milk

संशोधकांनी दुधासंदर्भातील अभ्यासासाठी जवळपास 20 लाख अमेरिकी आणि ब्रिटिश नागरिकांच्या माहिती तपासली होती. या संशोधनाचा अहवाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत दावा केला जात होता की दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी हानिकारक असतात. मात्र नव्या संशोधनात जे लोक दररोज एक ग्लास दूध पितात, त्यांचा हृदयविकाराचा धोका 14 टक्क्यांनी कमी होतो असे दिसून आले आहे.

    दिल्ली : नियमित दूध प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र याला संशोधनाअंती काढण्यात आलेल्या निष्कर्षाचा दुजोरा मिळाला आहे. एका आंतरराष्ट्रीय संशोधनात एक ग्लास दूध नियमितपणे प्यायल्यास हृदयाचे गंभीर आजार दूर ठेवता येतात असे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधनात समोर आले आहे की, दूध प्यायल्याने केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतोच शिवाय कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.

    संशोधकांनी दुधासंदर्भातील अभ्यासासाठी जवळपास 20 लाख अमेरिकी आणि ब्रिटिश नागरिकांच्या माहिती तपासली होती. या संशोधनाचा अहवाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत दावा केला जात होता की दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी हानिकारक असतात. मात्र नव्या संशोधनात जे लोक दररोज एक ग्लास दूध पितात, त्यांचा हृदयविकाराचा धोका 14 टक्क्यांनी कमी होतो असे दिसून आले आहे.

    दररोज दूध पिणार्‍या लोकांचे बॉडी मास इंडेक्स सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले याकडेही संशोधनात लक्ष वेधले गेले आहे. अभ्यासात कोलेस्टेरॉलच्या पातळीत घट झाल्यासंबंधी योग्य संबंध सापडलेला नाही. या संशोधनात अनेक विद्यापीठांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. नियमित दूध प्यायल्याने हाडे बळकट होतात. दूध शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे आणि प्रथिने देखील प्रदान करते. इंग्लंडमधील रिडींग विद्यापीठामध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले होते. या संशोधनाबाबत प्राध्यापक विमल काराणी यांनी माहिती दिली असून संशोधन अहवाल हा स्टडी इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रसिद्ध झाला आहे.