Night shifts can be dangerous; Risk of diseases such as heart disease, brain disease and cancer

जागरण करणाऱ्यांना मधुमेह, हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सर (कर्करोग) इत्यादी आजार होण्याचा धोका वाढतो. रिपोर्टनुसार, रात्री जागरण करून काम करताना डीएनएच्या पुनरनिर्मितीची प्रक्रिया मंदावते आणि बिघडते. अशा लोकांच्या डीएनए पुनरनिर्मितीची प्रक्रिया सामान्य व्यक्तीच्या तुलनेत 30% कमी असते. तसेच रात्रभर काम करून सकाळी पुरेशी झोप नाही घेतल्यास हा धोका आणखी 25 टक्क्यांनी वाढत असतो. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हे संशोधन 28 ते 33 वर्षे वयोगटातील निरोगी डॉक्टरांच्या ब्लड सॅम्पलवरून करण्यात आले आहे.

    नाईट शिफ्ट काम करताय तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याचा इशारा देणारी आहे. कारण नेहमीच रात्री जागरण करणे आणि नाईट शिफ्ट करणे किती घातक ठरू शकते यासंदर्भातील एक रिसर्च समोर आला आहे. नाईट शिफ्ट करणाऱ्यांच्या डीएनएला नुकसान होऊ शकतो. झोप पूर्ण न करता काम करत राहिल्यास अशा लोकांच्या डीएनएचे जीन पुनर्निर्मित होण्याची क्षमता अतिशय कमी होत जाते.

    अॅनेस्थेसिया अॅकेडमी जर्नलच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, जागरण करणाऱ्यांना मधुमेह, हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सर (कर्करोग) इत्यादी आजार होण्याचा धोका वाढतो. रिपोर्टनुसार, रात्री जागरण करून काम करताना डीएनएच्या पुनरनिर्मितीची प्रक्रिया मंदावते आणि बिघडते. अशा लोकांच्या डीएनए पुनरनिर्मितीची प्रक्रिया सामान्य व्यक्तीच्या तुलनेत 30% कमी असते. तसेच रात्रभर काम करून सकाळी पुरेशी झोप नाही घेतल्यास हा धोका आणखी 25 टक्क्यांनी वाढत असतो. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हे संशोधन 28 ते 33 वर्षे वयोगटातील निरोगी डॉक्टरांच्या ब्लड सॅम्पलवरून करण्यात आले आहे.

    त्या सर्वांना तीन रात्र जागे ठेवून रक्ताचा तपास करण्यात आला आहे. यामध्ये रात्री जागरण करणाऱ्या डॉक्टरांच्या रक्तामध्ये डीएनएची पुनरनिर्मिती कमी झाल्याचे आणि त्यांचा डीएनए बिघडल्याचे समोर आले आहे. डीएनए बिघडल्यास कधीच बरे न होणारे रोग उद्भवतात. यावर जास्तीत-जास्त संशोधन करून तातडीने त्यावर उपचारांचा शोध घ्यायला हवा असे संशोधकांनी म्हटले आहे. सामान्य व्यक्तीच्या शरीरात डीएनएमध्ये काही बिघाड झाल्यास शरीर पुन्हा डीएनए निर्माण करत असतो. रात्री जागरण करून काम करणाऱ्यांच्या शरीरात तसे काही होत नाही. अशात कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.