दुपारच्या झोपेने वाढतो मुलांचा IQ ; संशोधकांचा दावा

या संशोधनानुसार लहान मुलांनी जर दुपारच्यावेळी जर पुरेशी झोप घेतली तर त्यांचा आयक्यू वाढण्यास मदत होते. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया इरविनच्या संशोधकानुसार दुपारच्या वेळी जर मुलांनी पुरेशी झोप घेतली तर त्यांना ताजेतवाने वाटते. यामुळे त्यांचा आयक्यू वाढण्यास मदत मिळते. याबरोबरच त्यांच्या व्यवहारातही सुधारणा होते. आयक्यू वाढल्याने या मुलांच्या शिक्षणाच्या दर्जातही कमालीची सुधारणा होते. संशेधकांनी या संशोधनामध्ये चौथी, पाचवी व सहाव्या इयत्तेतील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना सहभागी करवून घेतले होते.

    दिल्ली : लहान मुलांना अनेक सवयी असतात; पण त्या काहीवेळा वेळेला अनुसरून नसतात. यामध्ये त्यांच्या खाण्याच्या अथवा झोपेच्या सवयीचा उल्लेख करावा लागेल. कधी कधी लहान मुले रात्रभर जागरण करतात आणि दिवसभर आरामात झोपा काढतात. लहान मुलांच्या झोपेच्या वेळेसंबंधी संशोधकांनी नुकतेच एक संशोधन केले आहे.

    या संशोधनानुसार लहान मुलांनी जर दुपारच्यावेळी जर पुरेशी झोप घेतली तर त्यांचा आयक्यू वाढण्यास मदत होते. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया इरविनच्या संशोधकानुसार दुपारच्या वेळी जर मुलांनी पुरेशी झोप घेतली तर त्यांना ताजेतवाने वाटते. यामुळे त्यांचा आयक्यू वाढण्यास मदत मिळते. याबरोबरच त्यांच्या व्यवहारातही सुधारणा होते. आयक्यू वाढल्याने या मुलांच्या शिक्षणाच्या दर्जातही कमालीची सुधारणा होते. संशेधकांनी या संशोधनामध्ये चौथी, पाचवी व सहाव्या इयत्तेतील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना सहभागी करवून घेतले होते.

    या सर्व मुलांचे वय 10 ते 12 वर्षे वयोगटादरम्यान होते. यामध्ये असे आढळून आले की, जी मुले दुपारी पुरेशी झोप घेत होती, ती मुले जास्त आनंदी आणि समाधानी दिसून येत होती. इतरांच्या तुलनेत त्यांचे स्वत:वरील नियंत्रण अत्यंत चांगले होते. आठवडाभरात तीन अथवा त्याहून अधिक दिवस दुपारची झोप घेणार्‍या मुलांचे प्रदर्शन 6.7 टक्यांनी सुधारल्याचे यावेळी दिसून आले. अशा मुलांमध्ये थकव्याचे प्रमाणही कमी असते.

    हे सुद्धा वाचा