‘या’ रक्तगटाच्या लोकांनी चुकूनही करू नये मांसाहार; जाणून घ्या कारण

A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींची पचनक्षमता बेताची असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी जेवणात खासकरुन..

    निरोगी आणि सुदृढ आरोग्य हवं असेल तर आपल्या आहारात सकस व पौष्टिक पदार्थांचा समावेश करा, असा सल्ला कायमच डॉक्टर देतात. शाकाहाराचा तुलनेत मांसाहारात प्रोटीन आणि व्हिटामीनची मात्र अधिक असल्याने आणि शिवाय चविष्ट असल्याने अनेकजण मांसाहार करतात, परंतु A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींची पचनक्षमता नाजूक असल्यामुळे त्यांनी हलका आहार घ्याव्या. पचनास जड असणारे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. यात खासकरुन मांसाहार टाळावा. कोणताही नॉनव्हेज पदार्थ पचायला वेळ लागतो. त्यामुळे या व्यक्तींनी शक्यतो मांसाहार टाळावा.

    A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींची पचनक्षमता बेताची असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी जेवणात खासकरुन पालेभाज्या, टोफू, मासे, डाळी यांचा समावेश केला पाहिजे. तसंच ऑलिव्ह ऑइल, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मका हे पदार्थदेखील A रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचे आहेत.