kidney disease

क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) ग्रस्त अनेक रुग्ण(CKD) शारीरिकदृष्ट्या फारसे सक्रिय नसतात.तसेच आजार नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत त्यांच्या शरीराची हालचाल व कामगिरी कमी झालेली दिसते. असे असले तरीही व्यायाम केल्याने अशा रुग्णांना फायदा होतो. या विषयावर नेफ्रोलॉजिस्ट डॉ सुरेश शंकर(Dr. Suresh shankar) यांनी खास मार्गदर्शन केलं आहे.

  किडनीचे दुर्धर आजार अर्थात क्रॉनिक किडनी डिसीज(CKD Patients) असलेल्या रुग्णांची तब्येत सुधारण्यासाठी साधेसोपे व्यायाम(Exercise) उपयुक्त ठरू शकतात. क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) ग्रस्त अनेक रुग्ण(CKD) शारीरिकदृष्ट्या फारसे सक्रिय नसतात.तसेच आजार नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत त्यांच्या शरीराची हालचाल व कामगिरी कमी झालेली दिसते. असे असले तरीही व्यायाम केल्याने अशा रुग्णांना फायदा होतो. या विषयावर नेफ्रोलॉजिस्ट डॉ सुरेश शंकर यांनी खास मार्गदर्शन केलं आहे.

  थकवा आणि स्नायूंचे कमकुवत होणे यामुळे क्रॉनिक किडनी डिजिज (सीकेडी) असलेल्या व्यक्तींच्या शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी होते. या आजारामध्ये शरीराची स्थिती बिघडत असल्याने तसेच स्नायूंची हानी होत असल्याने, किडनीचे कार्य मंदावत जात असल्याने आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांसारख्या इतर आजारांचा वाढता धोका असल्याने शरीर बऱ्याच प्रमाणात आक्रसत जाते. यामुळे जीवनमानाचा दर्जा खालावतो. वारंवार हॉस्पिटलमध्ये जावे लागते व मृत्यूचा धोकाही वाढतो.

  शरीराची अपेक्षित सुडौलता कायम राखण्यास मदत करणाऱ्या नियोजित, सुनिश्चित आखणी असलेल्या, वारंवार केल्या जाणाऱ्या शारीरिक हालचाली अशी व्यायामाची व्याख्या केली जाते.

  निष्क्रीय जीवनशैली हा हृदयाच्या अनारोग्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढविणारा घटक असू शकतो आणि आपल्या एकूण आरोग्याला नवसंजीवनी देण्यासाठी तसेच कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम उपयुक्त ठरू शकतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

  सीकेडीग्रस्त रुग्णांसाठी खडतर शारीरिक व्यायाम अधिकच घातक ठरतात असा समज एकेकाळी प्रचलित होता, पण कदाचित याच समजांमुळे हे रुग्ण व्यायामात क्वचितच सहभागी होताना दिसतात. सीकेडी रुग्णांनी जास्तीत-जास्त फायदे मिळवून देणारे आणि धोक्यांची शक्यता कमी करणारे व्यायाम करायला हवेत इतके मात्र खरे आहे.

  गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या संशोधनातून सीकेडी रुग्णांना रोज व्यायामापासून मिळणारे अगणित फायदे दिसून आले आहेत.

  व्यायामामुळे सीकेडी रुग्णांना होणारे शारिरीक आणि मानसिक फायदे

  •  शारीरिक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढते.
  • स्नायूंची हानी थांबते.
  • कार्डिओव्हॅस्क्युलर आरोग्यामध्ये सुधारणा होते.
  • पोषणाच्या मापदंडांनुसार आरोग्यात सुधारणा होते.
  • जळजळीचे जुनाट दुखणे कमी होते.
  • रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारतो.
  • चिंता, ताणतणाव आणि नैराश्य यांचे प्रमाण कमी होते.

  सीकेडीग्रस्त रुग्णांना नियमितपणे व्यायामप्रकार करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे.या सर्व रुग्णांना पुढील गोष्टींचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या व्यायामांचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.

  chronik kidney disease

  सीकेडी रुग्णांच्या व्यायामाच्या मर्यादा – सीकेडीच्या रुग्णांनी आपल्या शारीरिक व्यायाम करण्याच्या मर्यादा ध्यानात ठेवायला हव्यात आणि थकवा वाटत असेल, श्वास घ्यायला कष्ट पडत असतील, आजारी किंवा चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर व्यायाम करणे ताबडतोब थांबवले पाहिजे.

  वेदना, स्नायूंमध्ये पेटके येणे किंवा हृदयाची खूप जोरात धडधडणे अशी लक्षणे म्हणजे सुद्धा धोक्याची सूचना असू शकते. रुग्णाचे अंग तापल्यास, त्याची तब्येत खालावत असल्याचे जाणवल्यास किंवा तब्येतीचे दुसरे एखादे दुखणे व्यायामामुळे बळावत असल्याचे दिसल्यास व्यायाम उपचार थांबवायला हवेत.

  सीकेडी असलेल्या रुग्णांनी दर दिवशी किमान अर्धा तास आणि आठवड्यातून पाच वेळा शारीरिक व्यायाम केला पाहिजे,अशी शिफारस क्रॉनिक निफ्रोसिस किंवा मूत्रपिंडाचा जुनाट आजार असलेल्यांच्या जीवनशैलीच्या मूल्यमापनासाठी आणि व्यवस्थापनासाठी जारी करण्यात आलेल्या ताज्या नेफ्रोसिस इम्प्रुव्हिंग ग्लोबल आउटकम्स क्लिनिकल प्रॅक्टिस गाईडलाइनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे सीकेडी रुग्णांच्या बाबतीत शारीरिक हालचालींत वाढ करणे हा आजारास प्रतिबंध करण्याचा व त्याचे व्यवस्थापन करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.