सततच्या जांभया येतात; मग लगेच व्हा सावध

एका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणे हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. त्याचप्रमाणे ह्रदयविकाराचा झटका येणे, एपिलेप्सी, शरीरातील तापमान नियंत्रित नसणे इत्यादी समस्या जांभईमुळे डोके वर काढतात. त्यामुळे वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

    धावपळीचे दिवस, बदलती जीवनशैली, सतत वाढणारा तणाव, थकवा इत्यादी कारणांमुळे जांभई येते. व्यस्त वेळापत्रकामुळे शरीराला आराम मिळत नाही, त्यामुळे जांभई येते. पण सतत जांभई येणे आरोग्यास घातकसुद्धा ठरू शकते.

    शिवाय काही लोकांमध्ये पुरेशी झोप घेतल्यानंतरही वारंवार जांभई देण्याची सवय असते. जांभई केवळ कंटाळा आल्याचे संकेत देत नाहीत, तर यामागे काही आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोकाही असतो. शरीरात वाढणाऱ्या काही आजारांच्या धोक्याचे संकेत जांभईच्या माध्यमातून मिळू शकतात.

    – यकृताच्या (लिव्हर) समस्या असणाऱ्या व्यक्तींना सतत थकवा जाणवतो. थकव्यामुळे जांभई येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे संबंधित त्रासाबद्दल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
    – तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारामध्येही जांभई येण्याचे प्रमाण अधिक असते. हृदय आणि फुफ्फुसाचे काम नीट होत नसल्यास अस्थमाचा त्रास वाढू शकतो.

    – एका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणे हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. त्याचप्रमाणे ह्रदयविकाराचा झटका येणे, एपिलेप्सी, शरीरातील तापमान नियंत्रित नसणे इत्यादी समस्या जांभईमुळे डोके वर काढतात. त्यामुळे वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
    – ताणतणावामुळे रक्तदाबाचा त्रासही वाढतो. हृदयाची धडधड मंदावते. अशावेळेस मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही.