बटाटा सोला अन् तणाव कमी करा

तणावातून मुक्त होण्यासाठी लंडनमधील एका ‘डिपार्टमेंटल स्टोअर सेल्फ्रिज’मध्ये आयोजित करण्यात येणार्‍या कार्यशाळेत चक्क बटाटा सोलण्यास शिकवले जाते. ही कार्यशाळा म्हणजे ‘डब्ड युवर हाऊस’ चा एक भागच आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावापासून लांब राहणे जरा जिकिरीचेच असते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या समस्येने हैराण आणि तणावात असतो. या तणावातून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधणे तितकेच महत्त्वाचे असते. तणाव कमी झाल्यास मानसिक शांतता हमखास मिळते. विकसित लंडनमध्येही प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येच्या तणावाखाली असतोच. मात्र, हा तणाव दूर करण्यासाठी त्यांनी अनोखा उपाय शोधला आहे.

तणावातून मुक्त होण्यासाठी लंडनमधील एका ‘डिपार्टमेंटल स्टोअर सेल्फ्रिज’मध्ये आयोजित करण्यात येणार्‍या कार्यशाळेत चक्क बटाटा सोलण्यास शिकवले जाते. ही कार्यशाळा म्हणजे ‘डब्ड युवर हाऊस’ चा एक भागच आहे. याचा प्रमुख उद्देश म्हणजे तणावाखाली आणि चिंतीत असलेल्या ग्राहकांना मदत करणे. तसेच तणाव दूर करून त्यांचे जीवन आनंदी बनवणे. लोकांची तणावातून मुक्तता करण्यासाठी त्यांना येथे चक्क बटाटे सोलण्यास सांगितले जाते.  या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अँटोनिओ पाईनोंस यांनी सांगितले की, मी यापूर्वी कधीच बटाटे सोललेलो नव्हतो. मात्र, येथे बटाटे सोलताना मला एक वेगळाच आनंद मिळत आहे. हे करत असताना मला एकाग्रता आणि मानसिक समाधान मिळत आहे. यामुळे माझ्यावरील तणावाचे ओझेही हळू हळू कमी होत आहे.