तुम्ही इयरफोन वापरता? तुमच्या कान धोक्यात आहे ! लक्षात ठेवा या गोष्टी

ठराविक प्रमाणापेक्षा अधिक वेळ इयरफोन वापरणं, हे कानाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत असल्याचा निष्कर्ष नुकताच समोर आलाय.इयरफोन ही एक उत्तम सोय असली तरी त्याच्या अतिरेकामुळे आपल्या कानावर काही तात्पुरत्या स्वरुपाचे तर काही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

    इयरफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. घरात, प्रवासात, रस्त्यावर, ड्रायव्हिंग करताना आणि ऑफिसमध्येही अनेकजण इयरफोनचा वापर करत असतात. कधी मनोरंजनासाठी तर कधी कार्यालयीन कामासाठी इयरफोनचा वापर केला जातो.

    ठराविक प्रमाणापेक्षा अधिक वेळ इयरफोन वापरणं, हे कानाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत असल्याचा निष्कर्ष नुकताच समोर आलाय.इयरफोन ही एक उत्तम सोय असली तरी त्याच्या अतिरेकामुळे आपल्या कानावर काही तात्पुरत्या स्वरुपाचे तर काही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

    • इन्फेक्शन टाळा – सातत्याने हेडफोन वापरल्याने त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. त्याचप्रमाणे जर एकच इयरफोन अनेक व्यक्ती वापरत असतील, तरीदेखील इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे इयरफोन वापरताना प्रत्येक वेळी सॅनिटाईझ करून घेणं गरजचं आहे.
    • कानाच्या पडद्याला इजा – इयरफोन सातत्यानं ऐकल्यामुळे कानांची ऐकण्याची क्षमता कमी होेते. साधारण ५० डेसिबल्सपर्यंत ही क्षमता कमी होत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं दूरचं ऐकू येण्याची क्षमता घटत जाते.
    • ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम – अनेक इयरफोन्समध्ये हाय डेसिबल वेव्ह्ज असतात. त्यामुळे श्रवणशक्ती नाहीशी होण्याची प्रक्रिया सुरू होते.
    • मनोविकार – मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याने मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यातून अनेक मानसिक आजारांना निमंत्रण मिळतं.