खरंच गोरं व्हायचं आहे?; मग वापरा ‘हे’ घटक असणारे क्रीम

अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड - अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड म्हणजे एएचए हे त्वचेचा रंग उजळवण्यास खूप मदत करते. उसात आढळण्याऱ्या या घटकांचा उपयोग काही आयुर्वेदिक कंपन्या देखील करतात.

    झटपट गोरेपणा मिळवा, असा दावा करणाऱ्या अनेक फेअरनेस क्रीमच्या कंपन्या आहेत. परंतु या क्रीम कितपत परिणामकारक आहेत हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी क्रीमसंबंधी माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही पुढील टिप्सने योग्य क्रीम निवड करू शकता.

     

    व्हिटॅमिन ‘सी’ – व्हिटॅमिन ‘सी’मध्ये असलेले अल्ट्रा पोंटेंट अँटीऑक्सिडेंट्स त्वचेला उजळ करतात आणि त्वचेवरील डाग दूर करतात. कोणत्याही फेअरनेस क्रीममध्ये 10 टक्के व्हिटॅमिन ‘सी’ असणे आवश्यक आहे. तुम्ही क्रीमची निवड करताना याची नक्कीच पाहणी करू शकता.

    अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड – अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड म्हणजे एएचए हे त्वचेचा रंग उजळवण्यास खूप मदत करते. उसात आढळण्याऱ्या या घटकांचा उपयोग काही आयुर्वेदिक कंपन्या देखील करतात. एएचएमध्ये मुख्यत: दोन प्रकारचे अॅसिड असतात. लॅक्टिक आणि गायक्लॉनिक अॅसिड. कोणत्याही फेअरनेस क्रीममध्ये या दोन गोष्टी असणे खूप महत्त्वाचे असल्याने याची तुम्ही पाहणी करू शकतात.