रशियात संशोधकांनी स्वत:वरच केली कोरोना लसीची चाचणी

रशियात कोरोना विषाणूची पहिली लस (first Coronavirus vaccine) लाँचिंगसाठी तयार आहे. लसीची नोंदणी १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

जगातील कोरोना विषाणूची पहिली लस (First Covid-19 vaccine) १२ ऑगस्टला उपलब्ध होणार आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने याच आठवड्यात लसीची नोंदणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही जगातील पहिली अशी कोरोना लस असणार आहे जिला नियामक मान्यता (रेग्युलेटरी अप्रुव्हल) मिळणार आहे. ही लस रशियात सर्वांना देण्यात येणार आहे कारण कोरोना विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवी हाच त्यामागचा उद्देश आहे. रशियाच्या एका न्यूज एजन्सी नुसार, या लसीमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे संकेत मिळालेले नाहीत. या लसीचे सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होणार आहे. ऑक्टोबरपासून संपूर्ण रशियात सर्वांना ही लस देण्यास सुरूवात होणार आहे. जाणून घेऊयात ही लस कशाप्रकारे कार्य करते.

लसीतील घटकांची कॉपी करता येणार नाही

मॉस्कोतील गामलेया रिसर्च इंस्टिट्यूटने तयार केलेली ही लस एडेनोवायरसच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या घटकांचा (पार्टिकल्‍स) वापर करून बनविण्यात आली आहे. या संस्थेचे प्रमुख अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांच्या मते, जे घटक आणि वस्तू स्वत:ची कॉपी तयार करू शकतात, त्यांना जिवंत मानले जाते. लसीत जे घटक वापरण्यात आले आहेत, ते आपली कॉपी करू शकत नाही असेही गिंट्सबर्ग यांनी नमूद केले.

लस टोचल्यानंतर येतो ताप

काही जणांना लसीचा डोस घेतल्यानंतर ताप येतो असे अलेक्झांडर म्हणाले. अशा लोकांना त्यांनी पॅरासिटामॉल वापरण्याचा सल्ला दिला आहे. लस टोचल्यानंतर जेव्हा रोगप्रतिकार प्रणालीला पावरफुल बूस्ट मिळतो यामुळे प्रकृतीनुसार काहीजणांना ताप येतो. हा दुष्परिणाम पॅरासिटामॉलचा वापर करून दूर करता येतो असेही अलेक्झांडर यांनी स्पष्ट केले.
संशोधकांनी स्वत:ला टोचून घेतली उत्पादनात समावेश असलेल्या अन्य लोकांनी सर्वप्रथम स्वत:ला ही लस टोचून घेतली असल्याचे काही अहवालात म्हटले आहे.  या महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे असे रशियाच्या आरोग्यमंत्री मिखाइल मुराशको यांनी सांगितले.

WHO सह अन्य देशांनी व्यक्त केली शंका

रशियाने सर्वप्रथम कोरोना लस तयार केली असल्याचा दावा केला आहे परंतु अनेक तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रशियाने लसीशी संबंधित अधिक माहिती किंवा डेटा आपल्याकडे दिला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

COVAX मध्ये अनेक देशांनी सहभागी व्हावे : WHO (जागतिक आरोग्य संघटना)

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना त्यांच्या COVAX सुविधेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही एक प्रकारची आंतरराष्ट्रीय युती आहे जी लसीत सुधारणा आणि उत्पादन वाढविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. याचा उद्देश सर्वांना लस मिळावी हा आहे. याच्या माध्यमातून आर्थिक पाठबळही उभे करण्यात येत आहे. नवीन उपलब्ध माहितीनुसार अनेक देश यात सहभागी झाले आहेत पण १५ जुलैपर्यंत  WHO ने 75 देशांना यात स्वारस्य असल्याचे म्हटले आहे.