Science Fact; Eating raw salads invites many ailments

अनेकदा लोकं हेल्दी डाएट म्हणून कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर व इतर पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. भाज्या शिजवल्याने त्यातील पोषक नष्ट होतात हे खरं असले ,तरी भाज्या कच्च्या खाण्याचेही दुष्परिणाम असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    अनेकदा लोकं हेल्दी डाएट म्हणून कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर व इतर पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. भाज्या शिजवल्याने त्यातील पोषक नष्ट होतात हे खरं असले ,तरी भाज्या कच्च्या खाण्याचेही दुष्परिणाम असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    बीटाच्या सेवनाने शरिरात हिमोग्लोबिन वाढते. बीटाचा वापर सॅलड आणि सँडविचमध्ये केला जातो. काही लोक बीटचा ज्युसदेखील आवडीने पितात. मात्र बीट कच्च खाऊ नये कारण, बीटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सालेट असते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. पालक अनेकदा सलॅड म्हणून खाण्यात येते. कच्चा पालक खाणे धोकादायक ठरू शकते. पालक शिजवल्यावर त्यात आढळणाऱ्या आयरन आणि मॅग्नेशियम तत्त्वांमध्ये वाढ होते.

    गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आढळत ज्याने बॉडी व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट करते. गाजर शिजवल्यावर कॅरोटीनचे प्रमाण वाढते. शरीरात पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यात तसेच स्किनला पोषण मिळण्यासाठी ये आवश्यक तत्त्व आहे. फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली यांचा वापर सॅलडमध्ये केला जातो मात्र या कच्च्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस आणि अपचनसारखे त्रास होतात.

    कच्चे वांगी खाण्याचा प्रयत्न करू नये. वांग्यांमध्ये सोलानिन नामक तत्त्व मोठ्या प्रमाणात आढळते. कच्चे वांगी खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या होऊ शकते. म्हणून वांगी शिजवून खावे. टोमॅटोमध्ये आढळणाऱ्या लाईकोपीनमुळे याचा रंग लाल असतो. लाईकोपीनमुळे प्रोस्टेट कॅन्सर आणि हार्टच्या समस्या दूर राहतात. टोमॅटो शिजवून खाल्ल्याने लाईकोपीन शरीरात जास्त जलद व सहज शोषले जाते. बटाट्यांमध्ये आढळणारे स्टार्च बटाटे कच्चे खाल्ल्यास पचण्यास कठीण जाते. म्हणून बटाटे उकडून किंवा शिजवून खावेत. भाज्या कच्च्या असताना त्यामध्ये पोटात न विरघळणारी शुगर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच या भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा वाफवून खाव्यात.