शरीराच्या ‘त्या’ नाजूक भागवरचे केस काढावे की नाही?; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

  आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवस्थेत अनेक बदल होत असतातात. या बदलांना सामोरे जाणे ही एक अपरिहार्य गोष्ट आहे. विशेषतः पौंडावस्था हे आपल्या जीवनातील एक अतिशय नाजूक वळण असते. या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. यासाठी हार्मोन्स कारणीभूत ठरतात.

  या बदलांचा परिणाम आपल्या बाह्य शरीरा बरोबरच मानसिक स्वास्थ्यावरसुद्धा होत असतो. त्यामुळे आपण आपल्या मनाचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच याकाळात आपल्या पालकांचं मार्गदर्शन गरजेच असत. नाहीतर चुकीच्या माहितीमुळे नुकसान होऊ शकते.

  नको त्या गोष्टी पाहण आणि त्याचं अनुकरण करण्याचे प्रकार हल्ली वाढू लागले आहेत. गुप्तांगाचे केस काढण हा त्यातीलच एक प्रकार आहे. खरंतर या भागातले केस काढणे हा आजच्या पद्धतीनुसार ग्रुमिंगचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असला तरी  आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, ज्या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत त्यांचा आपल्या शरीरासाठी नक्कीच काही उपयोग असतो.

  म्हणूनच कोणतीही गोष्ट काढून टाकण्यापूर्वी तिच्या दुष्परिणामाबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. असे केल्याने आपल्याला अनेक त्वचारोग, इन्फेक्शन, पुरळ, असे प्रकार घडू शकतात. म्हणूनच योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

  मुळात या भागावर केस का असतात? यांची करणे जाणून घेणे आवश्यक आहे.

  घर्षण कमी करणे- गुप्तांगावरील केसांना ड्राय ल्युब्रिकटससुद्धा म्हणतात. शारीरिक संबंधांच्या वेळी होणारे घर्षण हे अनेक स मस्यांना जसे की पुरळ, खाज इत्यादींना कारण ठरू शकते. अशावेळी सहसा कृत्रिम ल्युब्रिकेशन वापरून समस्या कमी केल्या जातात पण आपल्या केसांमुळे हे काम आपोआपच होत असते. त्यामुळे आपल्या नाजूक त्वचेला इजा होत नाही.

  बॅक्टेरियापासून बचाव- आपल्या शरीरावरील केसांना नैसर्गिक फिल्टर मानले जाते. यामुळे बाहेरील बॅक्टेरिया तिथे अडकून राहतात, आणि त्यांना आपल्या शरीरात प्रवेश करता येत नाही. यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होते.

  फेरोमोन ट्रान्समिशन- शरीरातील बदल हे वायोमानाला दिलेला प्रतिसाद असतो. हे केस त्यांना अपवाद नाहीत. पौंडावस्थेत आपले शरीर हे प्रजननासाठी तयार होत असते. आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शरीर उत्तेजित होणे गरजेचे  असते. आपल्या या केसातून एक प्रकारचे सुगंधित केमिकल रसायन तयार करण्यास मदत करतात जे आपल्या पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी मदत करत असतात. ज्यामुळे आपली कामवासना वाढण्यास मदत होते.

  गुप्तांगावरचे केस कुणी काढावे? जाणून घ्या 

  ज्या पुरुषांचे किंवा स्त्रियांचे शरीर उष्ण आहे अशा लोकांनी त्या भागावरचे केस काढावेत कारण अनेक लोकांना त्या ठिकाणी घाम येतो.  ती जागा कायम झाकलेली असते त्यामुळे तेथे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. इन्फेक्शन झाल्यास खाज व घामोळ्याची समस्या उद्भवू शकते.

  तसेच जर महिलांना त्या भागावर  केस ठेवायचे असतील तर स्वछता ठेवणे खूप महत्वाचे आहे, कारण मासिक पाळीमध्ये अनके प्रकारचे बॅक्टेरिया त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात, अशावेळी स्वच्छतेअभावी युरीन इन्फेक्शन सारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.