तरुणांमध्ये वाढतंय सायलेंट अ‍टॅकचे प्रमाण

स्पर्धेच्या गुरफट्यात वेळेवर खाण्यापिण्याचे भान नसते. बहुधा, गृहिणींना एकतर स्वयंपाकासाठी सवड नसते किवा बाजारात (म्हणजेच रस्त्यावर) रेडिमेड अन्न मिळते म्हणून त्या कंटाळा करतात आणि कुटुंबाला जंक-फूड खायला घालतात.

    शरीरात लहानपणापासून कोलेस्ट्रॉल असते. खाण्यावर नियंत्रण ठेऊन, नियमित व्यायाम करून,आक्रोड खाऊन कोलेस्टेरोलवर नियंत्रण ठेवता येते, असे डॉक्टर मंडळी सुचवत असतात. फळे-भाज्या हृदयासाठी चांगले असतात, पण तेल वाईट असते. तिशीनंतर नियमित रक्त-तपासणी करून साखर, बी.पी., कोलेस्ट्रॉल तपासायला हवे. आवश्यकतेनुसार, टड्ढेड-मील आणि ईको-चाचणी करावी. मात्र, हा हृदयविकाराचा आजार अनुंवाशिक नाही, एवढे मात्र खरे.

    हृदयविकाराचा झटका आला की पहिल्या एका तासात मृत्यू ओढवत असतो. अशा वेळी रुग्णाला तत्काळ झोपवावे, त्याच्या जिभेखाली अ‍ॅस्पिरीन वा सोर्बिटड्ढेटची गोळी ठेवावी. वेळ न दवडता आणि रुग्णवाहिकेची वाट न बघता जवळच्या इस्पितळात न्यावे.

    एकवेळ देव क्षमा करतो, पण शरीर नाही, याकडे आपण पूर्णत: दुर्लक्ष करत असतो. आपल्या कुवतीपेक्षा अधिक हालचाली आपण करतो तेव्हा शरीर आपल्याला छोट्या-मोठ्या अनियमित लक्षणाद्वारे इशारा देण्याचे प्रयत्न करते. चालण्यासारखा साधसोपा व्यायाम आपण टाळतो. देऊळ, बाजार जवळच्या अंतरवर असूनही आपण पेटड्ढोल-डिझेलवर धावणा-या गाड्या वापरतो, व्यायामाला मुकतो. त्यातच, आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला चांगले घरगुती नि पौष्टिक खायलादेखील वेळ नसतो.

    स्पर्धेच्या गुरफट्यात वेळेवर खाण्यापिण्याचे भान नसते. बहुधा, गृहिणींना एकतर स्वयंपाकासाठी सवड नसते किवा बाजारात (म्हणजेच रस्त्यावर) रेडिमेड अन्न मिळते म्हणून त्या कंटाळा करतात आणि कुटुंबाला जंक-फूड खायला घालतात. हे जंकफूड चविष्ट लागते म्हणून तरुण मंडळी नि मुलेबाळे आनंदाने ओरपतात. अन्न चवदार होण्यासाठी त्यात अल्पप्रमाणात का होईना रसायने घातली जातात. चाइनिज फूड त्याचे जातीवंत उदाहरण होय. मॅगीवर बंदी आली आणि आपल्याकडची मंडळी बरीच हतबल झाली. पण, ते फास्ट-फूड आपल्या मुलाबाळांच्या शरीरात विषारी द्रव्ये घुसवित होती, त्याचे काय?

    या त्रुटीमुळे धावणा-या माणसाचे हृदय कंप पावताना एका भागात जाडसर बनते आणि त्या जड भागातून रक्ताचे अभिसरण होण्यास अडथळा येतो. विशेष म्हणजे अशा वेळी हृदयाचा जाडसरपणा 2-3 पटीने वाढतो. इंग्लिशमध्ये त्यास ‘अ‍ॅथेलेट्स हार्ट’ असे म्हणतात. सतत व्यायाम करणा-या माणसात ही हायपोटड्ढोफिची त्रुटी सौम्य स्वरुपात विकसित होत असते. माणूस सातत्याने धावतो तेव्हा ही त्रुटी डोके वर काढते हृदयक्रिया बंद होण्यास कारणीभूत ठरते.