avoid smoking after meal

कोरोना हा फुफ्फुसांसाठी घातक असल्यामुळे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते, असं अंगोदर सांगितलं जायचं. मात्र नव्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष याच्या अगदी उलटे आहेत. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनापासून संरक्षण मिळत असल्याचं या अभ्यासातून सांगण्यात आलंय. त्याचबरोबर शाकाहारी व्यक्ती या मांसाहारी व्यक्तींच्या तुलनेत कोरोनाला कमी बळी पडत असल्याचंही दिसून आलंय.

कोरोना कशामुळे होतो आणि कशामुळे रोखला जातो, याबाबतचा एक नवा अभ्यास समोर आलाय. यातील निष्कर्षानुसार धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती आणि शाकाहारी व्यक्ती यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा संभव कमी असल्याचं दिसून आलंय. सीएसआयआर (काऊन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च) च्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झालीय.

कोरोना हा फुफ्फुसांसाठी घातक असल्यामुळे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते, असं अंगोदर सांगितलं जायचं. मात्र नव्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष याच्या अगदी उलटे आहेत. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनापासून संरक्षण मिळत असल्याचं या अभ्यासातून सांगण्यात आलंय. त्याचबरोबर शाकाहारी व्यक्ती या मांसाहारी व्यक्तींच्या तुलनेत कोरोनाला कमी बळी पडत असल्याचंही दिसून आलंय.

ए आणि ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचंही या अभ्यासातून दिसून आलंय. तर बी आणि एबी ग्रुप वाल्यांना कोरोनाचा धोका तुलनेनं अधिक असल्याचं या अभ्यसातील निष्कर्ष सांगतात. एकूण १० हजार ४२७ लोकांचा सर्व्हे करण्यात आला, त्यातून हे निष्कर्ष काढण्यात आलेत. सर्व्हेत सहभागी झालेल्या १०.१४ टक्के लोकांमध्ये म्हणजेच १००० जणांमध्ये कोरोनाविरुद्धची अँटीबॉडी तयार झाल्याचंही दिसून आलं.

सहा महिन्यांनी याच लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी ३५ जणांमधील अँटीबॉडी घटल्याचं दिसून आलं. मात्र त्यांच्या शरीरातील प्लाज्मा ऍक्टिव्हीटी उच्च स्तरावर होती.