शक्तिवर्धक काजू… काजूचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

बदामाप्रमाणेच काजू खाण्याचेही अनेक फायदे आहेत. काजू हे शक्तिवर्धक आणि बहुगुणी आहेत. काजू नियमित खाल्ल्यास अनेक शारीरीक समस्यांपासून सुटका होते. विविध समस्यांवर काजू हे रामबाण उपाय आहे. थकवा

 बदामाप्रमाणेच काजू खाण्याचेही अनेक फायदे आहेत. काजू हे शक्तिवर्धक आणि बहुगुणी आहेत. काजू नियमित खाल्ल्यास अनेक शारीरीक समस्यांपासून सुटका होते. विविध समस्यांवर काजू हे रामबाण उपाय आहे.

थकवा दूर होतो
काजू हे शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे उत्तम माध्यम असून, याचा कोणताही दुष्परीणाम होत नाही. बऱ्याचदा आपण काही काम न करताही थकवा जाणवतो. यामुळे मूडही अपसेट होतो. अशा वेळेस 2-3 काजू तोंडात टाकावे. थकवा दूर झाल्यासारखे वाटेल.
आरोग्यदायी आणि सुंदर बनवते
काजूमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असताता. रोज काजू खाल्ल्यास केस आणि त्वचा निरोगी तसेच सुंदर बनते. यामुळे त्वचा तसेच केसांशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी दररोज काजू खावेत.
उत्तम कोलेस्ट्रॉल कंट्रोल
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काजू उत्तम उपाय आहे. भरपूर प्रोटीनयुक्त असलेले काजू पचनाला हलके असतात. शक्तिवर्धक अशा काजूमध्ये आयरनचे प्रमाण अधिक असते.
रक्त वाढविण्यास मदत करते
शरीरात रक्ताची कमी असल्यास नियमित काजू खावेत. काजू पाचनशक्ती वाढवितात. यामुळे भूकही जास्त लागते.
त्वचेसाठी वरदान
काजू हे त्वचेसाठी वरदान आहे. पाण्यात भिजवलेले काजू बारीक वाटून त्याने मसाज केल्यास रंग उजळतो. काजू ऑयली आणि ड्राय स्किनसाठी लाभदायक आहेत. काजू रात्रभर दुधात भिजवून सकाळी ते बारीक वाटावेत. यात मुलतानी माती, लिंबू अथवा दही मिसळावे. हे मिश्रण चेहऱ्याला लावून थोड्यावेळाने चेहरा धुवावा. ऑयली स्किनसाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.
स्मरणशक्ती वाढवते
काजूमध्ये विटामिन-बी नावाचे जीवनसत्त्व असते. यामुळे स्मरणशक्ती वाढविते. उपाशी पोटी काजू खाऊन थोडा मध चाखावा यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. काजूच्या सेवनामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.
हाडे मजबूत होतात
काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. तसेच हिरड्या आणि दातही निरोगी बनतात. काजूमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅट असतात. यामुळे आपले हृदय निरोगी बनते. काजू कर्करोगापासून बचाव करते.