मणक्याच्या दुखण्याने त्रस्त आहात?; वापरा ‘या’ सोप्या टिप्स

आपल्या आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने बस्ती, कटिबस्ती, षष्टीशाली पिण्डस्वेद, तैलधारा या वा तत्सम अन्य क्रिया आणि पोटातून घेण्याची आयुर्वेदीय औषधे घेण्यास सुरुवात करावी.

  – सकाळच्या वेळी पाठीवर आडवे पडून आपले दोन्ही पाय सायकलिंग केल्याप्रमाणे हलवावेत किंवा एक-एक करून दोन्ही पायांनी हवेत सावकाश आठ हा आकडा रेखाटावा. असे केल्याने कंबरेचे स्नायू मोकळे होऊन मणक्यावरील त्यांचा ताण कमी होतो.
  – आपल्या आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने बस्ती, कटिबस्ती, षष्टीशाली पिण्डस्वेद, तैलधारा या वा तत्सम अन्य क्रिया आणि पोटातून घेण्याची आयुर्वेदीय औषधे घेण्यास सुरुवात करावी.
  – आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आहारात डिंक, खजूर, उडीद, दूध, तूप यांचा समावेश करावा. तसेच आंबवलेले पदार्थ आणि एकंदरीतच वातूळ असलेले पदार्थ खाणे टाळावे.
  – आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने या त्रासावर उपयुक्त योगासने नियमितपणे करण्यास सुरुवात करावी.
  – मणक्यांच्या त्रासांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. पेनकिलर आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या हा काही यावरील इलाज नव्हे हे वेळीच लक्षात घ्या.
  आपल्या मणक्यांची काळजी घ्या. आयुष्यभर ताठ पाठ कण्याने जगा!!