येत्या पावसाळ्यात घ्या अशी बाळाची काळजी

पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात आद्रता कमी जास्त होत असते. तसेच विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण मिळत असते. त्यामुळे या ऋतु मध्ये सर्वांनीच स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.

 पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात आद्रता कमी जास्त होत असते. तसेच विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण मिळत असते. त्यामुळे या ऋतु मध्ये सर्वांनीच स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मोठे माणसं स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात.  वातावरणात बदल झाल्याने लहान बाळ आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लहान बाळांची या ऋतूमध्ये जास्त काळजी घेणे गरजेचे असते. अगदी सोप्प्या पद्धतीने आपण ही काळजी घेऊ शकतो. तसेच डॉक्टर कडे न जाता आपण आपल्या बाळाची योग्य पद्धतीने घरातच काळजी घेऊ शकतो.

*पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण हे वाढत असते. त्यामुळे बाळाला नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. 
*पावसाळा सुरू होण्यापूर्वी घराची नीट साफ सफाई करून घ्यावी. ज्यानेकरून डासांची पैदास घरात होणार नाही.
*बाळासाठी वापरण्यात येणारे कपडे वारंवार निर्जंतुक करणे गरजेचे असते.
*या काळात वातावरणात किटानुंचा संसर्ग वाढत असल्याने शकत्यो बाळाला घेऊन बाहेर जाणं टाळावे.
*पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.