अशी होते मधुमेहाची सुरवात सुरुवात; जाणून घ्या लक्षणं

वारंवार लघवी होत असल्यामुळे रक्तातील साखर ह्या लघवीवाटे बाहेर टाकली जाते. परिणामी वजन घटू लागते. तसेच जर मधुमेह असला, तर त्यामुळे आपण खात असलेल्या अन्नातील साखर आपल्या शरीरातील कोशिकांपर्यंत पोहोचू शकत नाही.

    पुष्कळदा मधुमेहाचे ( diabetes) निदान होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला देत असलेली धोक्याची सूचना ( symptoms) आपल्या लक्षातच येत नाही. मधुमेह उद्भविणार असल्याची निश्चित लक्षणे किंवा बदल आपल्या शरीरामध्ये घडून येत असतात. ह्यांकडे जर वेळीच लक्ष दिले, तर पुढील उपाययोजना तातडीने करून ह्या व्याधीचे लवकर निदान होऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ शकते.

    बहुतेकवेळी ही लक्षणे इतकी किरकोळ असतात, की ही लक्षणे इतक्या मोठ्या व्याधीची सूचक आहेत ही शक्यता विचारातच घेतली जात नाही. आणि जेव्हा लक्षणे बळावतात, तेव्हा व्याधीने शरीरामध्ये घर केलेले असते, आणि त्यामुळे कायमस्वरूपी औषधोपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे अगत्याचे आहे.

     

    सतत थकवा जाणवने
    आपण खात असलेल्या अन्नाचे परिवर्तन ग्लुकोजमध्ये होते. हे ग्लुकोज आपल्या शरीरातील कोशिकांना ऊर्जा देत असते. पण ग्लुकोजचे रुपांतर ऊर्जेमध्ये होण्यासाठी इंस्युलीनची आवश्यकता असते. जर कोशिका इंस्युलीन ‘रेसिस्ट’ करू लागल्या, म्हणजेच कोशिका इंस्युलीनला बाधक ठरू लागल्या, तर त्यांना उर्जाही मिळत नाही. परिणामी शरीरामध्ये ऊर्जा कमी होऊन सतत थकवा जाणवू लागतो. सतत थकवा जाणविणे हे मधुमेहाचे लक्षण आहे.

    वारंवार लघवीची भावना
    सामान्य प्रकृतीच्या मनुष्याला चोवीस तासांमध्ये चार ते पाच वेळी लघवीला जाण्याची आवश्यकता भासते. पण ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांची ब्लडशुगरची पातळी वाढलेली असते. ही पातळी खाली आणणे किडनीकरिता शक्य होत नाही, त्यामुळे शरीराला अधिक द्रव पदार्थांची आवश्यकता भासते. परिणामी वारंवार तहानेची भावना होऊन पाणी जास्त प्यायले जाते, आणि म्हणूनच वारंवार लघवीची भावना होणे, हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे.

     डोळ्यांचे विकार उद्भवने
    वारंवार लघवी होत असल्यामुळे रक्तातील साखर ह्या लघवीवाटे बाहेर टाकली जाते. परिणामी वजन घटू लागते. तसेच जर मधुमेह असला, तर त्यामुळे आपण खात असलेल्या अन्नातील साखर आपल्या शरीरातील कोशिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक कॅलरीज मिळत नाहीत. ह्यामुळे ही वजन झपाट्याने कमी होऊ लागते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागल्यास रक्ताची तपासणी करून घेणे इष्ट आहे. सतत तोंडाला, घशाला कोरड पडणे हे ही मधुमेहाचे लक्षण आहे. रक्तामध्ये साखरेची पातळी जास्त असेल, तर शरीरातील अनेक टिश्यू मधील फ्लुईडस् घेतले जातात. ही फ्लुईडस् डोळ्यांतील टिश्यू मधून देखील घेतली जात असतात. परिणामी दृष्टीदोष, डोळ्यांचे विकार उत्पन्न होऊ लागतात.

    जखम लवकर न भरणे
    शरीरावर एखादी जखम झाली, तर ती लवकर भरून न येणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे हातापायांना सतत मुंग्या येणे, हात पाय बधीर होणे हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. मधुमेह उद्भविणार असेल, तर त्वचेवरही ह्याची लक्षणे दिसून येऊ लागतात. ह्यामध्ये मानेवर, किंवा बगलांमध्ये त्वचेवर काळे चट्टे पडू लागतात. हे ही मधुमेहाचे लक्षण आहे. ह्यांपैकी कोणीही लक्षणे दिसून आली, तर त्वरित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.