family

बिहार व झारखंड सोडून देशात महिलांचे सरासरी वयोमान पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. बिहार व झारखंडमध्ये असे नाही. बांगलादेश व नेपाळदेखील भारतापेक्षा पुढे सरासरी वयोमानात भारताचा शेजारी देश बांगलादेश व नेपाळदेखील पुढे आहे

दिल्ली : देशातील लोकांच्या सरासरी वयोमानात (age of Indians) गेल्या दशकात वाढ झाली आहे. हे वयमान ०.४ वर्षे वाढून ६९.४ वर्षे एवढे झाले आहे. भारत ज्या सरासरी वयोमानात आता पोहोचला आहे. तीन दशकांपूर्वीच म्हणजेच १९९० मध्ये चीनचे सरासरी वयोमान एवढे होते. चीनचे सरासरी वयोमान ७६.७ वर्षे आहे. एवढेच नव्हे तर सरासरी वयोमानात भारताचे शेजारील देश बांगलादेश व नेपाळदेखील पुढे आहेत. डाटानुसार, भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सरासरी वयोमान अधिक आहे.

रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या (Registrar General’s Office)  ताज्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिमच्या (एमआरएस) डाटानुसार, २०१४-१८ मध्ये भारतात लोकांचे सरासरी वयोमान ६९.४ वर्षे झाले होते. १९७०-७५ दरम्यान भारताच्या लोकांचे सरासरी वयोमान फक्त ४९.७ एवढेच होते.

चीनमध्ये १९९० मध्ये आताच्या भारताएवढे प्रमाण

चीनविषयी बोलायचे झाले तर, भारत आता असलेल्या स्थितीत चीन १९९० मध्ये पोहोचला होता. म्हणजेच १९९० मध्ये चीनच्या लोकांचे सरासरी वयोमान ६९.४ वर्षे होते. भारत व चीनमध्ये सध्या लडाखमध्ये तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांची लष्करे समोरासमोर आहेत.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे सरासरी वयोमान

माहितीनुसार, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये व लिंगानुसार सरासरी वयोमान वेगवेगळे आहे. छत्तीसगढमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या पुरुषांचे सरासरी वयोमान ६३ वर्षांपेक्षा कमी आहे. तर हिमाचल प्रदेशातील शहरी भागात राहणाऱ्या महिलांचे सरासरी वयोमान सुमारे ८१ वर्षे आहे. याचाच अर्थ यात १८ वर्षांचा फरक आहे.

…तर ३ वर्षांनी वाढते वयोमान

जर जन्माच्या पहिल्या वर्षांपर्यंत मूल जीवित राहिले तर त्यांचे सरासरी वयोमान सुमारे ३ वर्षांनी वाढते. देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक नवजात मृत्यूदर (४३) आहे. तिथे मुलगा किंवा मुलगी जन्मानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वयोमान ४.४ वर्षे वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरी महिलांचे सरासरी वयोमान जास्त

देशातील शहरी भागात राहणाऱ्या महिलांचे सरासरी वयोमान केरळ व उत्तराखंड सोडून सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. केरळ व उत्तराखंडमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला अधिक काळ जगतात. शहरी भागात राहणाऱ्या महिलांचे सरासरी वयोमान जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक म्हणजे ८६.२ वर्षे एवढे आहे.

पुरुषांपेक्षा महिलांचे वयोमान अधिक

बिहार व झारखंड सोडून देशात महिलांचे सरासरी वयोमान पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. बिहार व झारखंडमध्ये असे नाही. बांगलादेश व नेपाळदेखील भारतापेक्षा पुढे सरासरी वयोमानात भारताचा शेजारी देश बांगलादेश व नेपाळदेखील पुढे आहे. युएन ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट २०१९ नुसार बांगलादेशातील लोकांचे सरासरी वयोमान ७२.१ वर्षे आहे व नेपाळमधील लोकांचे सरासरी वयोमान ७०.५ वर्षे आहे.