सावधान पुढे धोका आहे : दुसऱ्या लाटेपेक्षा भयानक असलेली कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता, निती आयोगाचा केंद्र सरकारला इशारा

या आधी देखील नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य असलेल्या डॉक्टर V. K. पॉल यांनी “तिसऱ्या लाटेत कदाचीत १०० पैकी १०० रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सरकारने आधिच याची तयारी करावी.” असं म्हटलं होतं.

    जगाच्या मागे लागलेली कोरोनाची साडेसाती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीय. आता कुठं दुसरी लाट ओसरुन सर्वकाही पुर्वपदावर येतय ना येतय तेच निती आयोगाच्या तज्ज्ञांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रामाणात होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता सरकारसह तज्ज्ञ देखील पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत.

    सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लागण झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून ही संख्या साधारण ४ ते ५ लाखांपर्यंत असू शकते. त्यामुळे पुढचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकारने किमान २ लाख ICU बेड्सची व्यवस्था करण्याची गरज आहे. असं निती आयोगाने म्हटलं आहे.

    एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशावरुन स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट या समितीने देखील तिसरी लाट ही अधिक हानिकारक असल्याचं म्हटलं आहे. या लाटेचा धोका प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक असून त्यांच्या उपचारासाठी सरकारने आत्ताच पुढील वैद्यकीय तयारीला लागावे. अशा सुचना दिल्या आहेत.

    दरम्यान, या आधी देखील नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य असलेल्या डॉक्टर V. K. पॉल यांनी “तिसऱ्या लाटेत कदाचीत १०० पैकी १०० रुग्णांना गृह विलगीकरणात न ठेवता उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सरकारने आधिच याची तयारी करावी.” असं म्हटलं होतं.

    त्यामुळे आता तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर सरकार काय उपाययोजना करतय हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.