गुळासोबत दही खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे; ‘या’ ८ तक्रारींवर आहे रामबाण उपाय

  आपण आपल्या आरोग्यासाठी काय करत नाही. कित्येक असे उपाय असतात ते आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी करत असतो. दही हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. दह्यात पौष्टीक तत्त्व जास्तप्रमाणत असतात,  पण दह्यासोबत गूळ म्हणजे एक उत्तम उपाय आहे.

  गुळात मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. दही आणि गूळ जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा ते आरोग्यासाठी अमृत बनते असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

  जाणून घेऊया दूध आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे 

   

  1) सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो :- जर तुम्हाला सर्दी-खोकला हि समस्या सतत असेल तर तुम्ही आंबट दह्यात गूळ आणि काळं तिखट मिसळून याचे नियमित सेवन करावे. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळतो. गुळात खनिजांसोबत पोट्याशिवायम, लोह, मॅगनीज, तांबे, आणि कॅल्शियम यांची मात्रा जास्त प्रमाणात असते. यामुळे तुमचे शरीर रोगापासून दूर राहते.

  2)शरीरात रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत :- जर तुमच्या शरीरात जर रक्ताचे प्रमाण कमी असेल तर तुम्हाला दह्यात गूळ मिसळून खाणे फायदेशीर होईल. गुळाचे सेवन जेंव्हा तुम्ही करता तेंव्हा तुमच्या शरीरतील जी रक्ताची कमतरता असते, ती भरून काढण्यास मोठा फायदा होतो. अशाप्रकारे दही आणि गूळ तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे तुमचे शरीर चांगल्याप्रकारे काम करू शकेल.

  ३) तणावापासून मुक्ती मिळते :- दही असा पदार्थ आहे, ज्याचा संबंध सरळ आपल्या मेंदूसोबत असतो. जर तुम्ही दही आणि गूळ मिसळून खातो तेंव्हा तुमचा तणाव कमी होतो. दह्यात शरीरातील तणाव दूर करणारे तत्व समाविष्ट असतात. रोज जर तुम्ही दह्यात गूळ मिसळून खाल तर तुम्हीं तणावमुक्त नक्कीच व्हाल.

  ४) मासिक पाळीत देतो आराम :- मासिक पाळीत पोट आकडने आणि दुखणे हि नेहमीची बाब आहे. अशात जर तुम्ही दही आणि गूळ यांचे एकत्रित सेवन कराल तर या दोन्ही समस्यांपासून तुम्हाला आराम जरूर मिळतो. फक्त मासिक पाळीत पोट आकडने नव्हे तर दुखणे सुद्धा दूर होते. म्हणून मासिक पाळीत दह्यासोबत गूळ हा रामबाण उपाय ठरतो.

  ५) पचनक्रिया सुधारतो :- शरीराची पचन क्रिया चांगली राहावी म्हणून जर कोणत्या गोष्टीची गरज असेल तर दही आणि गूळ. यामध्ये पचनक्रिया सुधारण्यास उपयोगी गोष्टी असतात. जर तुम्ही दही आणि गूळ यांचे सेवन रोज करत असाल तर यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता हि समस्या होणार नाही. याशिवाय ऍसिडिटी आणि डायरिया सारख्या समस्या होणार अहित. रोज एक वाटी दही गूळ मिसळून सेवन कराल तर तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले राहील.

  ६) हाडांच्या विकासात मदत होते :- दह्यात कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते, त्यामुळे तुमच्या हाडांचा विकास चंगल्याप्रकरे होतो. दात आणि नखांची मजबुती वाढते. याशिवाय शरीरातील स्नायू चांगल्याप्रकारे काम करतात. जेंव्हा दह्यात गूळ मिसळतो तेंव्हा याचा प्रभाव अजून वाढतो.

  ७) वजन कमी करण्यास मदत होते :- शरीराचा जडपणा हि मोठी समस्या आहे. कितीही उपाय केले तरी शरीराची जाडी कमी होत नाही. तर अशात दही आणि गूळ सेवन तुमच्यासाठी अत्यंत फयदेशीर आहे. नियमितपणे रोज तुम्ही दह्यात गूळ मिसळून खाल्याने काही दिवसतच तुम्हाला मोठा फरक जाणवेल.

  ८) थकवा दूर होतो :- दह्यात गूळ मिसळून खाण्याने आपले शरीर हाइड्रेट राहते. सोबतच तुमचा थकवा दूर होऊन शरीर शक्तीशाली बनते.