पपई खाण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे

पपई हे बहुगुणी आणि पचनशक्ती वाढविणारे फळ मानले जाते. पपईचा गर आणि बिया औषधी असतात. पपई चवदार आहे, त्याचबरोबर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. पपईने भूक आणि शक्ती वाढते. फलाहार हा आरोग्यासाठी कधीही उत्तम

पपई हे बहुगुणी आणि पचनशक्ती वाढविणारे फळ मानले जाते. पपईचा गर आणि बिया औषधी असतात. पपई चवदार आहे, त्याचबरोबर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. पपईने भूक आणि शक्ती वाढते. फलाहार हा आरोग्यासाठी कधीही उत्तम असतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही फळांची मोठी मदत मिळते. त्यामुळे डॉक्टर लहान मुलांसह वृद्धांनाही फळे भरपूर खाण्याचा सल्ला देतात जेणेकरून त्यांना यातून चांगले पोषणतत्त्व मिळतील. सफरचंद, चिकू, डाळिंब, करवंद, जांभूळ, मोसंबी, संत्रे, केळी, पपई अशी अनेक फळांची नावे घेता येईल की ती आरोग्यवर्धक आहेत. त्यातील पपई हे सुध्दा बहुगुणी आणि पचनशक्ती वाढविणारे फळ मानले जाते. पपईचा गर आणि बियांमध्ये औषधी असतात. पपईचा औषधी उपयोग आहे. पपई चवदार आहे त्याचबरोबर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. पपईने भूक आणि शक्ती वाढते.

रोगापासून मुक्ती देणारे फळ – 

– उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात.

– पपईत ए, बी, डी ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोह, प्रोटिन आदी तत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात.

– त्वचेचे रोग दूर होतात.

– जखम लवकर भरून येते.

– कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने भूक वाढते. काकडी आणि पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश ठेवल्यास आपली पचनशक्ती सुरळीत राहते. तसेच सौंदर्य कायम ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

– अॅ्लर्जी दूर करण्याचे कामही पपई करते.

– पपईच्या पानापासून तयार केलेला चहा हृदयविकारामध्ये उपयोगी ठरते.

– दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते.

– पपईचे दूध पाचक, जंतुनाशक असते. त्यामुळे कृमी नष्ट होतात.

– पपई खाल्ल्याने डोकेदुखी कमी होते.

– केवळ पपई खाल्ल्याने मुलांना, मोठ्यांना एनर्जी मिळते असे नाही तर पपईच्या ज्यूसमधून देखील हाय प्रोटीन मिळू शकते.

– संत्र्यांच्या ज्यूसमध्ये पपईचे तुकडे टाकले किंवा लिंबू सरबतात मध घातले तर ते शरीरासाठी पौष्टिक ठरते.

कर्करोगावर उपचार पपई खाल्ल्याने किंवा त्याचा ज्यूस घेतल्याने शरीरातील आजारावर नियंत्रण राहते. विशेषत: कर्करोगावर पपईचा ज्यूस हा एक रामबाण उपाय मानला जातो. पपईचा ज्यूस नियमित घेतल्याने कर्करोगाला प्रतिबंध होऊ शकतो. विशेषत: आतड्याचा कर्करोग होण्यापासून पपई परावृत्त करते. पचनासाठी मदत पपईचा ज्यूस हा पचनशक्ती वाढवितो. पोटातील गॅसेससंबंधीचे आजार कमी होतात. त्याचबरोबर बद्धकोष्टता कमी करण्याचे कामही पपई करते.

पपईमधील हाय फायबर घटक हा पोटातील विकारावर मात करतो आणि शरीरातील कामकाज सुरळीत ठेवण्यास मदत करतो. पचनशक्ती चांगली राहण्यासाठी पपई नियमित खाणे कधीही चांगले आहे. पोटात निर्माण होणाऱ्या जंताला रोखण्यासाठी पपई काम करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते पपईतील व्हिटॅमिन ए आणि सी हे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. आपल्याला जर नियमित थंडी, ताप यासारखे आजार होत असतील तर दररोज सकाळी ग्लासभर पपईचा ज्यूस घेणे गरजेचे आहे. कालांतराने आपल्याला कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागणार नाही. थकवा दूर करते कधी कधी सकाळी थकवा जाणवतो. अशावेळी पपईचा ज्यूस घेतल्याने हा थकवा दूर होण्यास हातभार लागते. त्यामुळे आपल्या आहारात पपईचा समावेश असावा.