मेथीच्या पाण्याचे आहेत ‘एवढे’ आरोग्यदायी फायदे, नक्की वाचा

मेथीच्या पाण्याचे असंख्य असे फायदे (so many health benefits of fenugreek water ) आहेत. या गोष्टीमुळे झोप न येण्याची आणि पोटदुखीची समस्याही दूर होऊ शकते.

मेथीची ( fenugreek (methi) हिरवी पालेभाजी आरोग्यासाठी (benefits for health ) खूप उपयुक्त आहे. तसेच मेथीच्या बीयांचा म्हणजेच मेथीदाण्यांचा वापरसुद्धा आपण खाद्यपदार्थांमध्ये (food) करतो. कारण मेथी दण्यांचे फायदे खूप आरोग्यदायी आहेत. त्याचप्रमाणे मेथीच्या पाण्याचे असंख्य असे फायदे (so many health benefits of fenugreek water ) आहेत. या गोष्टीमुळे झोप न येण्याची आणि पोटदुखीची समस्याही दूर होऊ शकते.

जाणून घ्या कशी आहे कृती

एक चमचा मेथी २ ग्लास पाण्यात टाकून उकळू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत उकळवा. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक-एक घोट प्या. वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचे सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावा.

अशा प्रकारे आरोग्यासाठी होईल फायदा :

कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित राहते, किडनीसंबंधी समस्या दूर होतात, डायबिटीसची समस्या दूर करण्यास मदत होते, हृदयासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते, केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो, फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी होतो, मेथीच्या पाण्याने पचनक्रियाही चांगली होते, पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.