लसूण खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे; ७२ रोगांवर करते काम

लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसूणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं.

    विविध अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, कच्च्या लसणाचे आरोग्यास होणारे फायदे बरेच आहेत ( Benefit’s of eating garlic). कित्येक शारिरीक अडचणींवर मात करण्यासाठी कच्च लसूण रामबाण उपाय आहे. शिवाय, आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासानुसार लसणाचे अनेक गुण समोर आले आहेत.

    स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसणामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते.

    आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. पण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं तुमच्या शरीराला सर्वाधिक लाभ मिळतात. निरोगी आरोग्य हवे असल्यास सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यासोबत कच्चे लसूण खावे, यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.

    लसूणमध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि अँटी व्हायरल हे गुणधर्म आहेत. हृदयाच्या निरोगी आयुष्यासाठी लसूण खूप गुणकारी आहे. लसूण खाल्याने रक्ताच्या गाठी होत नाहीत व त्यामुळे हृदयविकार होत नाही. तसेच भूक लागत नसल्यास कच्चा लसूण चावून खावा.

    ज्या लोकांना सर्दी, खोकला, अस्थमा, श्वासाचा त्रास होतो त्या लोकांनी नियमित लसणाचे सेवन करावे. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीसुद्धा लसूण मदत करतो. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. यामध्ये अँटी ओबेसिटी गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.

    याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसूणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील.

    लसणामध्ये विटामिन ए, बी, सी, तसेच आयर्न, पोटॅशियम यासारखी पोषक तत्वे आढळतात. ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे, व त्यांना रक्त पातळ होण्याची गोळी सुरू आहे त्यांनी कच्च्या लसणाचे सेवन करावे कारण लसूनही रक्त पातळ करण्याचे काम करतो.