bad habits affecting kidney

शरीरामध्ये किडनीचं काम अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्या शरीरातली घाण आणि अनावश्यक घटक बाहेर फेकण्याचं काम किडनी करते. काही वाईट सवयींमुळे किडनी फेल ( Bad Habits Which Leads To Kidney Fail) होऊ शकते.

  आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कितीतरी वाईट सवयी आपल्याला असतात आणि या सगळ्याचा हळूहळू आपल्या किडनीवर वाईट परिणाम (Bad Effects on Kidney) होत असतो. किडनी आपलं रक्त साफ करून त्यापासून युरिन (Urine) तयार करते. त्यामुळेच शरीरामध्ये किडनीचं काम अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्या शरीरातली घाण आणि अनावश्यक घटक बाहेर फेकण्याचं काम किडनी करते. काही वाईट सवयींमुळे किडनी फेल ( Bad Habits Which Leads To Kidney Fail) होऊ शकते. या सवयी जाणून घेऊयात.

  दररोज मांसाहार – आपला आहार नेहमीच बॅलन्स असायला हवा. पण, काही लोकांना दररोज मांसाहारी पदार्थ खायला आवडतात. चिकन, मटण किंवा एखादं अंड तरी ते खातातच. पण अतिरिक्त प्रमाणामध्ये मांसाहारी पदार्थाने किडनीवरती परिणाम होत असतो. या पदार्थांमुळे शरीरामध्ये किडनी स्टोन (Kidney Stone) तयार होऊ शकतो. मांसाहारी पदार्थांमुळे शरीरात युरिक ऍसिड (Uric Acid) वाढत जातं. त्यामुळे अतिप्रमाणामध्ये मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत.

  लघवीला जाणे टाळणे – पोटामध्ये युरिन किंवा लघवी साठत राहणं आपल्या आरोग्याला हानिकारक असतं. जास्त प्रमाणामध्ये युरिन साठल्यानंतर किडनीवर दबाव येतो. शरीरात विषारी पदार्थ वाढायला लागतात आणि त्याचा उलटा प्रभाव किडनीवरच होतो.

  पाण्याचे कमी सेवन – बऱ्याच लोकांना अतिशय कमी पाणी पिण्याची सवय असते. फार तहान लागली तरी एकदोन घोट पाणी पिऊन ते केवळ घसा ओला करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते किमान आठ ग्लास तरी पाणी दिवसभरात पाणी प्यायला हवं. योग्य प्रमाणात शरीरात पाणी नसेल तर, किडनीवर दबाव पडतो. पाणी कमी असल्यामुळे विषारी पदार्थ शरीरात साठायला लागतात आणि मग अनेक आजार वाढायला लागतात. यामुळे किडनीवर जास्त परिणाम होतो.

  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या खाणे – डोकदुखी, अंगदुखी यासारख्या क्षुल्लक कारणांसाठी बरेच लोक पेनकिलर खातात. मात्र पेनकिलरचे आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होतात. पेन किलरने किडनीवरती वाईट परिणाम होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर किंवा अँटिबायोटिक घेऊ नयेत.

  ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नसणे – हाय ब्लड प्रेशरमुळे रक्त पुरवठा करणाऱ्या पेशींवर दबाव पडत असतो. यामुळे किडनीवरही निगेटिव्ह परिणाम होतो. त्यामुळे आपला बीपी कंट्रोलमध्ये राहायला हवा. ब्लड प्रेशर वाढतोय असं लक्षात आल्याबरोबर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.