Corona Vaccination Center, Mumbai

कोरोनावरील लस(corona vaccine) आता उपलब्ध झाली आहे. देशभरात लसीकरणदेखील सुरु झाले आहे. डोस घेण्याआधी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या सूचना कोणत्या ते पाहूयात.

  कोरोनावरील लस(corona vaccine) आता उपलब्ध झाली आहे. देशभरात लसीकरणदेखील सुरु झाले आहे. डोस घेण्याआधी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या सूचना कोणत्या ते पाहूयात.

  आहार (diet)
  कोरोनाचा डोस घेण्यापूर्वी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. संतुलित आहार घेतल्याने फक्त कोरोनाच नाही तर इतर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येत नाही.

  पाणी(water)
  शरीर हायड्रेट करण्यासाठी भरपूर पाणी प्या. शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होणे चांगले नसते. लस घेण्यापूर्वी शरीर हायड्रटेड असेल असे बघा.

  टेन्शन नको(tension)
  मनात भीती न बाळगता कोरोनाची लस घ्या. टेन्शन घेऊ नका. मानसिकदृष्ट्या खंबीर राहा.

  झोप(sleep)
  वेळेवर झोप घेणे खूप आवश्यक आहे. कोणत्याही लशीच्या ॲन्टीबॉडीज तयार होण्यासाठी झोप पूर्ण होणं आवश्यक असल्याचं तज्ञ सांगतात.

  व्यायाम(exercise)
  रोज व्यायाम करणे फक्त लसीकरणासाठी नाही तर संपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे. व्यायामामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे लस घेण्याच्या २,४ दिवस आधीपासूनच व्यायाम करायला सुरुवात करा.