कॅल्शियमच्या कमतरतेची ‘ही’ आहेत लक्षणे; जाणून घ्या कॅल्शियमचे महत्व

स्त्रियांना लांब व मजबूत नखे ठेवण्याची फार आवड असते. परंतु नखे सतत तुटत असतील व कमजोर झाली असतील तर शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे असे समजा.

  शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक तत्त्वांची गरज असते. वाढत्या वयाबरोबर या तत्वांची गरजही वाढत जाते. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याची लक्षणे दिसत असल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

  कमजोर हाडे
  शरीरात कॅल्शियमची कमी झाल्यास त्याचा प्रभाव हाडांवर दिसायला लागतो. सांधेदुखी वाढते. काही लोकांना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रिकेट्स नावाचा आजार होतो.

  ठिसूळ दात
  ज्यांचे दात सतत दुखत असतात, पिवळे पडतात त्यांना कॅल्शियमची कमी जाणवते. यामुळे दात ठिसूळ बनतात.

  नखे
  स्त्रियांना लांब व मजबूत नखे ठेवण्याची फार आवड असते. परंतु नखे सतत तुटत असतील व कमजोर झाली असतील तर शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे असे समजा.

  अनियमित मासिक पाळी
  कॅल्शियमच्या कमीमुळे मासिक पाळी अनियमित होते किंवा पाळीदरम्यान स्त्राव कमी होतो. अशावेळी पोट दुखण्याचा अधिक त्रास होतो.

  केस गळणे
  शरीरात या पोषक तत्वाची कमतरता झाल्यास केस गळायला लागतात. तसेच केस रूक्ष होतात.